व्हिडिओ डाउनलोड करणं झालं सोपं
ट्वीटरने यूजर्सना कोणताही व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा दिली आहे. परंतु प्रत्येक वापरकर्त्यास ही सेवा मिळेल असे नाही. हे फीचर फक्त त्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांच्याकडे ट्वीटर ब्लूचं सबस्क्रिप्शन आहे. ट्विटर हेल्प सेंटरनुसार, सध्या हे फीचर iOS साठी जारी केले जात आहे. लवकरच ही सेवा Android आणि वेब वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध करून दिली जाईल, असं सांगितलं जात असून आता व्हिडीओ कसे डाऊनलोड करायचे ते जाणून घेऊ…
आयफोनवर ट्वीटर व्हिडिओ कसे डाउनलोड कराल?
स्टेप १: तुम्हाला Twitter वरून डाउनलोड करायचा असलेल्या व्हिडिओवर जा.
स्टेप २: यानंतर, व्हिडीओ प्ले झाल्यावर प्लेअरच्या वर उजव्या बाजूला तीन ठिपके असतील, त्यावर क्लिक करा.
स्टेप ३: नंतर व्हिडिओ डाउनलोड करा या ऑप्शनवर टॅप करा आणि व्हिडीओ डाऊनलोड होईल.
Twitter ची कमाई घटली
एलन मस्कने १० महिन्यांपूर्वी ट्वीटर विकत घेतले. पण आता ट्विटरच्या जाहिरातींच्या कमाईत जवळपास ५० टक्क्यांची घट झाल्याची बातमी आहे. या प्रचंड भारामुळे ट्वीटरचे मोठे नुकसान होत आहे. एलन मस्कने ट्वीटर विकत घेण्यासाठी खूप पैसे घेतले होते. अशा परिस्थितीत मस्क यांना ट्वीटरसाठी घेतलेल्या कर्जासाठी व्याज म्हणून सुमारे १.५ अब्ज डॉलर्स म्हणजेच १२ हजार कोटी रुपये वार्षिक द्यावे लागतात. म्हणजेच दरमहा सरासरी १ हजार कोटी रुपये व्याज भरावे लागत आहे.
वाचा : Virat Kohli Earbuds : कोहली वापरतो ‘या’ कंपनीचे इअरबड्स, किंमत आहे २० हजार, वाचा सविस्तर