‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आणि अजूनही यशस्वीरित्या हा सिनेमा देशभरात सुरू आहे. चित्रपटाने खर्चापेक्षा दहापट अधिक कमाई करून इतिहास रचला. यशस्वी चित्रपटांच्या या मालिकेत आता आणखी एका मराठी चित्रपटाचे नाव जोडले गेले आहे. आम्ही बोलत आहोत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अफलातून’ या चित्रपटाबद्दल.
या कमी बजेटच्या कॉमेडी चित्रपटात चित्रपटात जॉनी लिवर, सिद्धार्थ जाधव, भरत दाभोळकर, जयेश ठक्कर जेटी आणि श्वेता गुलाटी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाची कथा तीन मित्रांभोवती फिरते. श्री, आदित्य आणि मानव अपंग असून आपली कमकुवत आर्थिक परिस्थिती हाताळण्यासाठी गुप्तहेर संस्था सुरू करतात.
जबरदस्त कमाईसह ओपनिंग
संपूर्ण चित्रपटाची कथा त्यांच्या एजन्सीभोवती विणलेली आहे. ‘अफलातून’मध्ये विनोदी आणि अभिनयाचा सांगड घालण्यात आली आहे. २१ जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला हा चित्रपट अवघ्या ४ कोटींमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ९५ लाखांच्या कलेक्शनसह चांगली ओपनिंग केली.
एका आठवड्यात कमाई दुप्पट
चित्रपटाचे कलेक्शन दुसऱ्या दिवशी २.०३ कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी २.८८ कोटी रुपये झाले. आता चित्रपटाचे एकूण कलेक्शन ८ कोटींच्या आसपास पोहोचले आहे. या चित्रपटाने अवघ्या एका आठवड्यात जवळपास दुप्पट कमाई केली आहे.