महाराष्ट्र राज्य क्रिडा व युवक सेवा संचालनालयात महाभरती..

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून (Maharashtra State Sports and Youth Services) महाभरती घेण्यात येत आहे. अराजपत्रित गट ब व गट ड संवर्गातील विविध पदांच्या जागा रिक्त असून यामध्ये क्रीडा अधिकारी ते शिपाई पदापर्यंत १११ पदांसाठी ही भरती होणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करायचा असून १० ऑगस्ट ही अर्ज भरण्याची अंतिम तारीखअसेल. या भरतीतील रिक्त पदे कोणती, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि कसा अर्ज कराल हे आता सविस्तर पाहूया..

पदे आणि पदांची संख्या पुढीलप्रमाणे:

क्रिडा अधिकारी – ५९
क्रिडा मार्गदर्शक – ५०
कनिष्ठ श्रेणी लघुलेखक – ०१
शिपाई – ०१
एकुण पदसंख्या – १११

शैक्षणिक पात्रता :

क्रिडा अधिकारी आणि क्रिडा मार्गदर्शक:

या पदांसाठी अर्जदार उमेदवार हा सांविधिक विद्यापीठाच्या कला / विज्ञान / वाणिज्य किंवा विधी शाखेतील पदवीसह मान्यताप्राप्त संस्थेची शारीरिक शिक्षण पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

कनिष्ठ श्रेणी लघुलेखक:

या पदाकरीता उमेदवार हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही, इतक्या गतीचे इंग्रजी टंक लेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
.

शिपाई:

या पदाकरीता उमेदवार हे इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

असा भराल अर्ज :

अर्जदार उमेदवारांना विहीत कालावधीमध्ये म्हणजे १० ऑगस्टच्या आधी ऑनलाईन पद्धतीने https://sports.maharashtra.gov.in/sports_web/ या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहेत . सदर पदभरती साठी जनरल उमेदवारांकरीता १०००/- रुपये तर मागास वर्गीय / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग उमेदवारांकरीता ९००/- आवेदन शुल्क आकारण्यात आले आहे.

वयोमर्यादा :

या भरतीमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी ‘१८ ते ४० वर्षे’ तर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ‘१८ ते ४५ वर्षे’ इतकी वयोमर्यादा आहे.

Source link

government jobs in maharashtraJob Newsmahabharti in maharashtramaharashtra governmentsports department maharashtrasports jobesyouth service
Comments (0)
Add Comment