५५ व्या सांस्कृतिक युवा महोत्सवाचे पारितोषिक वितरण; स्पर्धेत पोदार कॉलेजची बाजी

University of Mumbai Youth Festival: मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ५५ व्या सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये यश संपादन केलेल्या विजेत्यांचा आज मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक युवा महोत्सवाच्या राज्यस्तरीय, पश्चिम विभागीय आणि राष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेतेपद प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचाही आज मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच, ५५ व्या युवा सांस्कृतिक युवा महोत्सावामध्ये ज्या महाविद्यालयांनी सर्वसाधारण विजेतेपद मिळवले त्यांचाही सत्कार करून आयोजन समितीतील सदस्यांनाही सन्मानित करण्यात आले.

भारतीय विश्वविद्यालय संघाच्या महासचिव तथा माजी कुलगुरू डॉ. पंकज मित्तल, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. सुनील भिरुड, प्राचार्य डॉ. महेश जोशी आणि समीर कर्वे यांच्या हस्ते या सर्व विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

(वाचा : D. Pharm. FY Result: फार्मसीच्या प्रथम प्रथम वर्षीय डिप्लोमा अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा)

यामध्ये सर्वसाधारण विजेतेपद पोतदार महाविद्यालय, दुसरे पारितोषिक मिठीबाई महाविद्यालय आणि तिसरे पारितोषिक विवा महाविद्यालयांना प्रदान करण्यात आले. तर ११ झोनमधील सर्वसाधारण विजेतेपट प्राप्त केलेल्या ११ महाविद्यालयांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अंतिम फेरीसाठी सहभागी झालेल्या महाविद्यालयामधून संगीत, नाटक, ललीतकला, वांड्मय आणि नृत्य या पाचही विभागामध्ये सर्वसाधारण विजेतेपत प्राप्त महाविद्यालयांचाही सन्मान करण्यात आला.

फोटो सौजन्य : मुंबई विद्यापीठ

जॅकपॉट स्पर्धेचा विजेता म्हणून मिठीबाई महाविद्यालयातील विद्यार्थी कृष्णा बिरला यास मिस्टर युनिव्हर्सिटी आणि एम.डी. महाविद्यालयातील पुर्वा घाटकर या विद्यार्थीनीस मिस युनिव्हर्सिटीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अमन सिंह यास गोल्डन बॉय आणि आश्ना जैन या विद्यार्थींनीस अधिकाधीक स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल गोल्डन बॉय आणि गोल्डन गर्ल पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

(वाचा : ‘अहिल्याबाई’च्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या एतशाचं झालंय इतकं शिक्षण, अभ्यासतही दाखवली चमक)

भारतीय विश्वविद्यालय संघाच्या महासचिव तथा माजी कुलगुरू डॉ. पंकज मित्तल यांनी सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. युवा महोत्सव सारख्या स्तूत्य उपक्रमातून अनेक प्रतिभावंताना त्यांच्यातील सूप्त कला गुणांचा अविष्कार करण्याची मोठी संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तर युवा सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यापीठाने अनेक तरुण कलावंत घडविले असून ही प्रक्रिया निरंतर सूरु असल्याचे प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनिल पाटील यांनी सांस्कृतिक युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीवर प्रकाश टाकला. सूत्र संचालन निलेश सावे आणि डॉ. महेश देशमूख यांनी केले.

फोटो सौजन्य : मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठातर्फे दरवर्षी या सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवातील प्राथमिक फेऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सात जिल्ह्यातील विविध अकरा परिक्षेत्रात दिनांक ३ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२२ या दरम्यान आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये जवळपास ३४० हून अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेतला. यामध्ये संगीत, नृत्य, नाट्य, वांड्मय आणि ललीत कला या एकूण पाच कला प्रकारातील विविध ४१ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक फेरीतील विजेत्यांचे अंतिम फेरीसाठी झालेल्या निवडीचे सादरीकरण हे ८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत घेण्यात आले होते. यामधून विजयी झालेल्या विजेत्यांची निवड करून आणि संघ तयार करून या संघामार्फत राज्यस्तरीय, पश्चिम क्षेत्र आणि देश पातळीवरील आंतरविद्यापीठीय सांस्कृतिक युवा महोत्सवात मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करण्यात आले आहे.

(वाचा : RCFL Recruitment 2023: आरसीएफमध्ये १२४ जागांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या)

Source link

college festivalseducation newsmithibai collegeMU Youth Festivalmumbai universitypodar collegeUniversity of Mumbai Youth Festivalviva collegeyouth festivalYouth Festival 2023
Comments (0)
Add Comment