India Post Payments Bank Bharti 2023: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने करार तत्त्वावर भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. २६ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या भरती अंतर्गत देशाच्या विविध राज्यांमधील एकूण १३२ पदांसाठी नियुक्त्या करण्यात येणार आहेत.
(भरतीशी संबंधित अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
(भरतीशी संबंधित अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा)
अधिसूचनेनुसार, कार्यकारी पदांसाठी निवड ऑनलाइन परीक्षा, चर्चा (Group Discussion)आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३०,००० रुपये मानधन दिले जाईल. शिवाय, निवड झालेल्या उमेदवारांना नियमांतर्गत येणाऱ्या इतर भत्त्याचाही लाभ मिळणार आहे.
महत्वाच्या तारखा :
- अर्ज सुरू होण्याची तारीख : २६ जुलै २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ ऑगस्ट २०२३
वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २१ ते ३५ वर्षे एवढे असावे.
आयपीपीबीच्या या भरतीच्या वयोमर्यादेसंदर्भातील अधिक तपशील उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पाहू शकतात.
(वाचा : RCFL Recruitment 2023: आरसीएफमध्ये १२४ जागांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या)
श्रेणीनिहाय भरती :
- सामान्य श्रेणी (General) : ५६ जागा
- अनुसूचित जाती (SC) : १९ जागा
- अनुसूचित जमाती (ST) : ९ जागा
- ओबीसी – ३५ जागा
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील उमेदवार : १३ जागा
राज्यनिहाय भरती :
- आसाम : २६
- छत्तीसगड : २७
- हिमाचल प्रदेश: १२
- जम्मू आणि काश्मीर: ७
- लडाख : १
- अरुणाचल प्रदेश: १०
- मणिपूर : ९
- मेघालय: ८
- मिझोराम : ६
- नागालँड : ९
- त्रिपुरा: ५
- उत्तराखंड : १२
शैक्षणिक पात्रता :
- पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- मात्र, सध्या फायनान्स आणि सेल्समध्ये पदवीधर झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
अर्ज शुल्क :
- SC, ST, PWD उमेदवारांना अर्जासाठी १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहेत.
- तर, इतर प्रवर्गातील उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
असा करा अर्ज :
- सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
- त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
- वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
- त्यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
- यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
(वाचा : SSC Recruitment 2023: भारत सरकारच्या ‘स्टाफ सिलेक्शन कमिशन’कडून तब्बल १३२४ जागांसाठी मेगाभरती; लगेच करा अर्ज)