अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आणि मेसेज धोकादायक असू शकतात
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना मलेशिया, केनिया, व्हिएतनाम आणि इथिओपिया सारख्या देशांमधून ISD कोड असलेल्या नंबरवरून कॉल प्राप्त होत आहेत. यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण याला एक प्रकारची फसवणूक म्हटले जाऊ शकते. कारण अनेकांनी १ ते २ दिवसांनंतर २ ते ४ कॉल आल्याची तक्रार केली आहे. नुकतेच नवीन सिम घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून अधिक कॉल येत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे कॉल्स कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमची माहिती घेऊन पैसे लुटण्याचे प्रकार सुरू आहेत.
या सर्वाविरुद्ध व्हॉट्सअॅपही सज्ज
हे प्रकरण काही काळापूर्वी चर्चेत आले होते. ज्यांना अनोळखी नंबरवरून कॉल किंवा मेसेज येत आहेत त्यांना व्हॉट्सअॅपने हे नंबर कळवण्याचा आणि ब्लॉक करण्याचा सल्ला दिला आहे. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे- “संशयास्पद संदेश/कॉल अवरोधित करणे आणि तक्रार करणे ही अशा फसवणुकीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.” जेव्हा वापरकर्त्यांना अनोळखी आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत फोन नंबरवरून कॉल येतात, तेव्हा त्यांनी तक्रार करणे आणि त्यांना ब्लॉक करणे आवश्यक आहे.
तुम्हाला हा त्रास असेल तर काय कराल?
यूजर्स हे नंबर थेट व्हॉट्सअॅपवरून ब्लॉक करू शकतात. अशा कोणत्याही व्यक्तीशी बोलू नका, त्यांना तुमची कोणतीही माहिती देऊ नका. या कॉलर्सपासून मुक्त होण्यासाठी आणि त्यांना ब्लॉक करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा
स्टेप्स १ : WhatsApp उघडा, सेटिंग्ज पर्याय वर जा.
स्टेप्स २: आता प्रायव्हसीवर टॅप करा आणि ब्लॉक कॉन्टॅक्ट वर जा.
स्टेप्स ३: त्यात Add yटणावर टॅप करा.
स्टेप्स ४ : आता जो नंबर ब्लॉक करायचा आहे तो शोधा आणि Add वर क्लिक करा.
वाचा :काय सांगता? Apple चे शूज? किंमत ४० लाख रुपये, वाचा सविस्तर