Mumbai University Result 2023: मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या अंतिम वर्षाच्या मे २०२३ मध्ये संपन्न झालेल्या उन्हाळी सत्राच्या विज्ञान विद्याशाखेच्या तृतीय वर्ष बीएससी आयटी सत्र ६ (Bsc IT Sem 6) या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
बीएससी आयटी (BSc Information Technology) सत्र ६ च्या परीक्षेमध्ये एकूण ३ हजार ४४० विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ८ हजार ०५७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७ हजार ९३० एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ (Appeared) झाले होते. तर ३२ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच, या परीक्षेत २ हजार ६६० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. बीएससी आयटी सत्र ६ चा निकाल ५६.३९ टक्के लागला आहे.

विद्यापीठाने आजपर्यंत २०२३ च्या उन्हाळी सत्राचे १४१ निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेचे निकाल विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
आतापर्यंत १४१ निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठातर्फे उन्हाळी सत्राचे आतापर्यंत विद्यापीठाने १४१ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आज विद्यापीठाने तृतीय वर्ष बीएससी आयटी सत्र ६ चे निकाल जाहीर केले आहेत.
नोंदणीकृत विद्यार्थी :८ हजार ०५७ विद्यार्थी
उपस्थित विद्यार्थी : ७ हजार ९३० विद्यार्थी
गैरहजर विद्यार्थी : १२७ विद्यार्थी
उत्तीर्ण विद्यार्थी : ३ हजार ४४० विद्यार्थी
अनुत्तीर्ण विद्यार्थी : २ हजार ६६० विद्यार्थी
उत्तीर्णतेची टक्केवारी : ५६.३९ टक्के