का करायचा डिजीटल मार्केटिंगचा कोर्स?
तुम्ही टेकसॅव्ही असाल आणि टेक्नॉलॉजीत चांगलं भविष्य घडवू इच्छिता तर तुम्ही हा कोर्स नक्की करा. भारतात इंटरनेट क्रांतीची झाली आहे. बहुतांश कंपन्याआपल्या मार्केटिंगच्या रणनिती इंटरनेटला ध्यानात ठेवून तयार करतात. येणारी वर्षे इंटरनेटची असतील आणि तेव्हा डिजीटल मार्केटींग तज्ज्ञांना चांगली मागणी असेल.
(वाचा : Career In AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात करिअर करायचंय; या कोर्सेसनंतर मिळणार कामाची उत्तम संधी)
सध्या वेगाने डिजिटलायझेशन होत आहे, त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांची मागणी वाढत आहे.मार्केटिंग इंडस्ट्री हा असा उद्योग मानला जातो ज्यामध्ये सहज कमाई करता येते, त्यासाठी फक्त तुमच्यातील कौशल्याची गरज असते. काळानुसार मार्केटिंग बदलले आहे आणि लोकांनी मार्केटिंगची डिजीटल आवृत्ती स्वीकारली आहे. डिजीटल मार्केटिंगमुळे या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
1. मार्केटिंग मॅनेजर (Marketing Manager)
कोणत्याही कंपनीच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती विपणन व्यवस्थापकाची (Marketing Manager). मार्केटिंग मॅनेजर कंपनीला किंवा एखाद्या संस्थेला पुढे नेण्यासाठी त्या कंपनी अथवा संस्थेची जाहीरात करतो. कोणत्याही कंपनीच्या वाढीसाठी मार्केटिंग महत्त्वाचे असते, त्यामुळे या भूमिकेला (Digital Marketing Career) नेहमीच मागणी असते. या पोस्टवर, उमेदवारांना वार्षिक 6 ते 7 लाखांचा प्रारंभिक पगार मिळू शकतो. अनुभवानुसार तुमचा पगार वाढू शकतो.
2. व्यवस्थापन सल्लागार (Management Consultant)
व्यवस्थापन क्षेत्रात व्यवस्थापन सल्लागार महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्हालाही बाजाराची ओळख असेल आणि त्यातील बदलांची नेहमीच जाणीव असेल, तर हे क्षेत्र फक्त तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही कंपनीला नवीन कल्पना घेऊन त्याचा व्यवसाय नवीन उंचीवर नेऊ शकत असाल तर तुम्हाला या क्षेत्रात नेहमीच मागणी असेल. या पदासाठी तुम्हाला 10 लाख ते 30 लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.
(वाचा : Career in Agriculture: कृषी क्षेत्रात प्रगती करण्यासाठी जाणून घ्या उत्तम दर्जाचे शिक्षण कुठे मिळेल)
3. सोशल मीडिया व्यवस्थापक (Social Media Manager)
सध्याच्या काळात सोशल मीडिया कंपनीच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावते. सोशल मीडिया मॅनेजरचे काम सोशल मीडिया ट्रेंड आणि त्यावर होत असलेल्या उपक्रमांकडे लक्ष देणे आणि कंपनीला पुढे नेण्यासाठी त्यानुसार कार्य करणे असे आहे. जर तुम्हाला मार्केटिंग क्षेत्रात वापरल्या (Digital Marketing Career) जाणार्या टूल्सचीही चांगली माहिती असेल तर तुम्ही या क्षेत्रात नोकरी करू शकता. भारतात सोशल मीडिया मॅनेजरचा सरासरी पगार 30 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. तो वेळ आणि अनुभवानुसार वाढत जातो.
4. काही अन्य पर्याय (Other Career Opportunities)
याशिवाय, मार्केटिंग क्षेत्रात करिअरचे आणखी काही पर्याय आहेत, ज्यामध्ये SEO डायरेक्टर, ईमेल मार्केटिंग मॅनेजर, डिजीटल अॅडव्हर्टायझिंग मॅनेजर, सर्च इंजिन मार्केटिंग डायरेक्टर, व्हिडिओ मार्केटिंग मॅनेजर अशा सर्व पदांना बाजारात सतत मागणी असते, त्यामुळे या क्षेत्रात उत्तम पगारही मिळवता येतो.
(वाचा : IITB BSc Engineering: आयआयटी मुंबईच्या बीटेक कोर्सच्या तिसऱ्या वर्षी बाहेर पडल्यानंतर मिळणार बीएससीची पदवी)