आयडॉलच्या प्रवेशास मुदतवाढ; १४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना सादर करता येणार ऑनलाइन अर्ज

MU Idol Admission 2023-24: मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल) च्या जुलै सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत ३१ जुलै २०२३ पर्यंत होती. परंतु आता या प्रवेशांना विदद्यापीठाच्या वतीने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली असून, १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत विद्यार्थ्यांना आपले अर्ज सादर करता येणार आहेत. आजपर्यंत या सत्रात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात १२ हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

एमए मानसशास्त्र, पत्रकारिता व जनसंपर्क अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु :

यूजीसीने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आयडॉलच्या एमए मानसशास्त्र , एमए पत्रकारिता व एमए जनसंपर्क या तीन नव्या अभ्यासक्रमाला मान्यता दिली आहे. या तिन्ही अभ्यासक्रमाचेही प्रवेश सुरू आहेत.

(वाचा : Digital Marketing: डिजीटल मार्केटिंग म्हणजे नेमके काय? कोणत्या आहेत भविष्यातील संधी)

पदवीस्तरावरील प्रथम,द्वितीय व तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स, बीएस्सी आयटी,बीएस्सी कम्प्युटर सायन्स हे अभ्यासक्रम व पदव्युत्तर स्तरावरील प्रथम व द्वितीय वर्ष एमए (इतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, मराठी,हिंदी, इंग्रजी), एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी, एमएस्सी कॉम्पुटर सायन्स व पदव्युत्तर पदविका पीजी डीएफएम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे. हे प्रवेश ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.

विभागीय उपकेंद्रावर मार्गदर्शन व अध्ययन साहित्य वितरण

आयडॉलचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून याठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण होणार आहे. पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरू होणार आहे.

अभ्यासक्रम निहाय आजपर्यंत प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या :

१. प्रथम वर्ष बीए : २ हजार ७७१ विद्यार्थी
२. प्रथम वर्ष बी. कॉम : ३ हजार ६४४ विद्यार्थी
३. प्रथम वर्ष बीकॉम अकाउंट्स अँन्ड फायनान्स : २३२ विद्यार्थी
४. प्रथम वर्ष बीएस्सी आयटी व कॉम्प्युटर सायन्स : ३७० विद्यार्थी
५. प्रथम वर्ष एमए : १ हजार ६०२ विद्यार्थी
६. प्रथम वर्ष एमकॉम : हजार २४६० विद्यार्थी
७. प्रथम वर्ष एमएस्सी : ४१२ विद्यार्थी

(वाचा : Education or Personal Loan: एज्युकेशन लोन की पर्सनल लोन काय ठरते शिक्षणासाठी योग्य, विद्यार्थ्यांना हे माहीत असणे गरजेचे)

Source link

graduation admission deadlineidol admissionIdol Admission Admission UpdatesIdol Admission Notificationmu idol admissionmu idol admission 2023-24Mumbai University Admission Updatespg admissionsPost Graduation Admission Deadlineuniversity of mumbai
Comments (0)
Add Comment