अतिवृष्टीमुळे २७ जुलैच्या रद्द झालेल्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर; या दिवशी होणार परीक्षा

Mumbai University Exam Reschedule 2023: मुंबईसह कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाची हजेरी असून १९, २०, २१ आणि २७ जुलैला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याना जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पावसाचा आढावा घेत, शाळा-कॉलेजांना सुट्ट्या देण्याचे आदेश दिले होते. तर, मुंबई विद्यापीठानेही नियोजित परीक्षा पुढे ढकलणार असल्याचे जाहीर केले होते.

पावसाच्या रेड अलर्टमुळे मुंबई, ठाणे, पालघर , रायगड , रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या शासन आदेशानुसार व रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी होणाऱ्या १५ परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या, त्या परीक्षा दिनांक १, ५, ८ व ११ ऑगस्ट रोजी होणार आहेत. या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी प्रसिद्ध केले आहे.

(वाचा : MU Idol Admission 2023-24: आयडॉलच्या प्रवेशास मुदतवाढ; १४ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना सादर करता येणार ऑनलाइन अर्ज)

दिनांक २७ जुलैची बीपीएड व एमपीएड ( प्रोग्राम क्रमांक 4P00112, 4P00212, 4P00114 & 4P00214 ) ची परीक्षा १ ऑगस्ट रोजी होणार आहे.

या सोबतच, तृतीय वर्ष बीए सत्र ५ (3A00145 ), एमए सत्र १ (सीबीसीजीएस ) ( 3A00521), एमए सत्र १ (चॉईस बेस) (3A00531), एमकॉम सत्र ४ ( ६०:४०) (2C00554), एमएससी आयटी व एमएससी कॉम्प्युटर सायन्स (६०:४०) सत्र ४, एमएससी गणित (८०:२०) सत्र ४ (1S01154), एमसीए सत्र ३ ( 1T 00163) यांच्या परीक्षा ५ ऑगस्ट रोजी होणार आहे.

तसेच, द्वितीय वर्ष बीबीए/ एलएलबी ( ५ वर्षीय कोर्स ) सत्र ३ व ४ ( प्रोग्राम क्रमांक 3L00413 & 3L00414) ही परीक्षा दिनांक ८ ऑगस्ट रोजी होणार आहे.

एमए / एमएससी & एमएससी रिसर्च सत्र १ ( प्रोग्राम क्रमांक 3A00521, 3A00531, 1S01111, 1S01121) ची परीक्षा दिनांक ११ ऑगस्ट रोजी होणार आहे.

या परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर घेण्यात येतील असल्याची माहितीही विद्यापीठाच्या वतीने परिपत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवाय, परीक्षेच्या सुधारित तारखाही मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी परिपत्रकाच्या माध्यमातून प्रसिद्ध केल्या आहेत.

(वाचा : Education or Personal Loan: एज्युकेशन लोन की पर्सनल लोन काय ठरते शिक्षणासाठी योग्य, विद्यार्थ्यांना हे माहीत असणे गरजेचे)

Source link

Exam Cellexam rescheduleexam time tableMU Exam Reschedule 2023MU Examsmumbai universityMumbai University ExamMumbai University Exam Reschedule 2023mumbai university examsred alert
Comments (0)
Add Comment