धक्कादायक! कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली १७ ठेवीदारांना १२ लाख रुपयांना गंडा

हायलाइट्स:

  • आर्थिक फसवणुकीचं आणखी एक प्रकरण आलं समोर
  • कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली ठेवीदारांची मोठी फसवणूक
  • १७ ठेवीदारांना १२ लाख ११ हजार १५० रुपयांना घातला गंडा

औरंगाबाद : युटूव्ही ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केल्यास दामदुपटीने परतावा मिळेल असं आमिष दाखवून १७ ठेवीदारांना १२ लाख ११ हजार १५० रुपयांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुख्‍य आरोपी सतीश श्रीपत तिवारी (४८, रा. उत्तर प्रदेश) याला गुरुवारी (१९ ऑगस्ट) सकाळी औरंगाबाद आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्यात यापूर्वी आरोपीचे साथीदार तसंच कंपनीचा एमडी नवलकिशोर पांडे आणि कंपनीची सभासद सुनिता करमाकर या दोघांना अटक करण्‍यात आलेली आहे.

समर्थनगरातील तेजस्विनी सुधाकर गायकवाड (३८) यांनी मार्च २०१८ मध्ये वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या जाहिरातीवरून युटूव्ही ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी कंपनीचा सीएमडी असल्याचे सांगून सतीश तिवारी, जागृती देसाई, सुनिता करमकर, नवलकिशोर पांडे आणि कमल श्रीवास यांनी गायकवाड यांना आपल्या कंपनीत पैसे गुंतवण्यासाठी दामदुपटीचे आमिष दाखवलं.

उमरखेड: दराटीजवळ शिवाजीनगर तांड्यावर पूर; ३० घरे गेली वाहून

आमिषाला बळी पडून गायकवाड यांनी एक लाख ७२ हजार सहाशे रुपये गुंतवले होते. सुरुवातीच्या काळात कंपनीने गायकवाड यांना १६ हजार २०० रुपये परतावा दिला. परंतु, त्यानंतर तिवारी याने परतावा देण्यास चालढकल करण्यास सुरूवात केली. तसेच तिवारी याने गायकवाड यांना दिलेले धनादेशही वटले नाहीत. या प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कोल्हापुरात चोरट्यांचा धुमाकूळ; बंद घरांना केले लक्ष्य

गुन्‍ह्याच्‍या तपासादरम्यान मुख्‍य आरोपी सतीश तिवारी याने १७ ठेवीदारांची फसवणूक केल्याचे समोर आले. आरोपीविरोधात उल्‍हासनगर पोलीस ठाण्‍यात अशाच प्रकारचा गुन्‍हा दाखल आहे, त्‍यात पोलिसांनी त्‍याला अटक केली. त्‍यांनतर औरंगाबाद आर्थिक गुन्‍हे शाखेने त्‍याला कारागृहातून ताब्यात घेत अटक केली.

२४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

सदर प्रकरणातील मुख्य आरोपी तिवारी याला गुरुवारी जिल्हा व सत्र न्‍यायाधीश ए.एस. खडसे यांच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. सहायक लोकाभियोक्ता राजु पहाडीया यांनी आरोपीचा गुन्‍हा करण्‍यामागील हेतू काय, आरोपीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केली असून तो पैसा आरोपीने कोठे व कसा वापरला याचा तपास बाकी आहे. गुन्‍ह्यातील रक्कम हडप करुन आरोपीने स्‍वत: च्‍या तसेच नातेवाईकांच्‍या नावे काही स्‍थावर व जंगम मालमत्‍ता खरेदी केली आहे का, याचा देखील तपास बाकी असल्‍याने आरोपीला पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली. न्यायालयाने आरोपीला २४ ऑगस्‍टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत.

Source link

aurangabad newscrime newsआर्थिक फसवणूकऔरंगाबादऔरंगाबाद क्राइमक्राइम न्यूज
Comments (0)
Add Comment