मराठी भाषिकांसाठी तेही मुंबईमध्ये ही नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. जर तुम्ही उत्तम मराठी लिहू शकता, बोलू शकता तुमच्याकडे पत्रकारितेचा अनुभव असेल किंवा शिक्षण असेल तर अशांसाठी दूरदर्शनमध्ये मोठी भरती सुरु आहे. विशेष म्हणजे इथे ‘मराठी’ला प्राधान्य दिले जाणार आहे.
प्रसार भारती दूरदर्शन मुंबईमध्ये वृत्त विभागात २२ रिक्त पदांची भरती सुरु असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. दूरदर्शन भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेनुसार माध्यम क्षेत्रातील विविध एकूण १० पदे आणि २२ जागांसाठी ही भरती आहे. दूरदर्शन भरती २०२३ च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराच्या कामाचा कालावधी १ वर्षांपर्यंत असेल. त्यानंतर उमेदवाराचे काम आणि माध्यमाची गरज पाहून पुढचा कार्यकाळ वाढवला किंवा कमी केला जाईल. यासंदर्भात प्रसारभारतीने २७ जुलै रोजी जाहीर निवेदन केले असून तेव्हापासुन १० दिवसात उमेदवारांनी हा अर्ज भरणे बंधनकारक आहे.
एकूण पदसंख्या : २२
या पदांसाठी भरती :
अँकर आणि वार्ताहर – श्रेणी २ – २
अँकर आणि वार्ताहर – श्रेणी ३ – २
असाइनमेंट कोओर्डीनेटर – १
ब्रॉडकास्ट एक्झक्युटिव्ह – ३
बातमीपत्र संपादक – २
कंटेन्ट एक्झक्युटीव्ह – २
कॉपी एडिटर – २
पॅकेजिंग असिस्टंट – २
व्हिडिओग्राफर – २
व्हिडीओ पोस्ट प्रॉडक्शन असिस्टंट (व्हिडीओ एडिटर) – ४
(वाचा: नव्या शैक्षणिक धोरणातील ‘एंट्री – एक्झिट’ फिचर विद्यार्थ्यांसाठी ठरणार वरदान!.. वाचा, काय आहे हे..)
पात्रता :
पत्रकारितेतील अनुभवी, कार्यकुशल उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. त्या-त्या पदानुसार किमान ३ ते ५ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता देखील पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे निवेदक, वार्ताहर, संपादक या पदाच्या उमेदवारांचे मराठी भाषेवर प्रभुत्व असायला हवे तर व्हिडीओग्राफर आणि संकलक हे त्यांच्या कामामध्ये तंत्र कुशल असणे आवश्यक आहे. भरतीसाठीची पदे आणि त्यासाठी लागणारी पात्रता आणि सर्व तपशील प्रसार भरतीच्या https://prasarbharati.gov.in/pbvacancies या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता, कामाचे स्वरूप, अनुभव, वेतन याची सविस्तर माहिती दिली आहे.
कुठे अर्ज कराल:
आपल्या इच्छित पदासाठी दूरदर्शनमध्ये अर्ज करायचा असल्यास https://applications.prasarbharati.org हि लिंक देण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक पदासाठीचा अर्ज स्वतंत्र असून आवश्यक ती माहिती त्यामध्ये भरून ते ऑनलाईनच दाखल करायचे आहे.
निवड प्रक्रिया :
व्हिडिओग्राफर पदासाठी उमेदवारांची निवड चाचणी/मुलाखतीद्वारी केली जाईल. तसेच केवळ निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी किंवा चाचणीसाठी बोलावले जाईल. चाचणी/मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही प्रवास आणि निवास भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही.
पगार :
या भरती प्रक्रीयेत प्रत्येत पदासाठी वेगळे वेतन आहे. अंदाजे ३० हजार ते ६० पर्यंतची वेतन रक्कम असून वेगवेगळ्या श्रेणीनुसार तो देण्यात येणार आहे. हे काम कंत्राटी असल्याने यामध्ये पेन्शनसाठीच्या कोणत्याही रकमेची तरदूत नसेल.
(वाचा: UGC: देशातील सर्व महाविद्यालयांवर अंकुश ठेवणारे ‘यूजीसी’ नेमके आहे तरी काय?)