आज अनेक ओटीटी माध्यमे असली तरी नेटक्लिक्स आपला दर्जा राखून आहे शिवाय जागतिक पातळीवरही नेटफ्लिक्सचे स्थान अव्वल आहे. त्यामुळे इथे नोकरी करणे किंवा नेटफ्लिक्स साठी काम करणेही संधी क्वचितच कुणाच्या वाट्याला येते. आता अशीच एक नोकरी नेटफ्लिक्सने समोर आणली आहे. ज्याचा पगार ऐकून भल्या भाल्यांचे डोळे पांढरे होतील.
ही नोकरी आहे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॅनेजर’ची. गेल्या काही दिवसांपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ‘एआय’ हा चर्चेचा विषय ठरत आहे. कारण ‘एआय’मुळे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नोकऱ्या जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे आणि नेमकं नेटफ्लिक्स अशाच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या शोधात आहे.
कोटींचा पगार:
नेटफ्लिक्सने ‘एआय’साठी नोकरीची ऑफर दिली असून यासाठी कोट्यावधी रुपये मोजण्याची तयारी दाखवली आहे. नेटफ्लिक्स सध्या ‘एआय प्रॉडक्ट मॅनेजर’च्या शोधात आहे. यासाठी नेटफ्लिक्स 9 लाख डॉलर पर्यंत वार्षिक पगार देणार म्हणजे म्हणजेच वर्षाला अंदाजे 7.4 कोटी रुपये इतका पगार या एआय मॅनेजरला मिळणार आहे.
काम काय असेल?
या ‘एआय’ प्रॉडक्ट मॅनेजर’ ला नेटफ्लिक्सच्या मशीन लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करण्याचे मुख्य काम असेल तर कंटेंट तयार करण्यासाठी ‘एआय’’चा वापर करणे ही त्याची जबाबदारी असेल.
(वाचा: ‘मराठी’वर प्रभुत्व आहे.. मग दूरदर्शनमध्ये सुरु आहे महाभरती.. ‘या’ जागांसाठी करा अर्ज..)
या शिवाय इतर पदांसाठीही ऑफर:
नेटफ्लिक्सला ‘एआय प्रॉडक्ट मॅनेजर’ शिवाय ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’शी संबंधित इतर लोकांचीही आवश्यकता आहे. नेटफ्लिक्सने ‘टेक्निकल डायरेक्टर’ची जागा देखील रिक्त असल्याचे सांगितले आहे. या पदासाठी नेटफ्लिक्स वर्षाला 4.5 लाख ते 6.5 लाख डॉलर्स पगार देणार आहे. म्हणजेच वर्षाला ३.७० कोटी ते ५.३५ कोटी इतका पगार या पदासाठी देण्यात येणार आहे.
हॉलिवूमधून विरोध:
आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार असल्याची चिंता जगापुढे असल्याने हॉलीवूडने याला विरोध दर्शवला आहे. अशातच नेटफ्लिक्स ‘एआय’ संदर्भातील पदांची भरती करत असल्याने हॉलिवूडच्या रायटर्स असोसिएशन आणि इतर संस्था यांनी नेटफ्लिक्सच्या भूमिकेचा निषेध केला आहे. मनोरंजन विश्वातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अल्गोरिदमच्या वापरावर हॉलिवूडकर चांगलेच नाराज आहेत.
काय आहे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’:
आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मशीन लर्निंगचाएक भाग आहे. म्हणजे या प्रणालीमध्ये असा यांत्रिकी मेंदू तयार केला जातो तो माणसाप्रमाणेच विचार करू शकतो. जिवंत माणसासारखा तोही विचार करून कंटेंट तयार करू शकतो. त्यामध्ये हवा तो कंटेंट तयार करण्याची त्याला भाषांतरित करण्याची क्षमता असेल. असे झाल्यास मनोरंजन विश्वावर याचा मोठा नकारात्मक परिणाम होईल. म्हणूनच याला हॉलिवूडमधून विरोध होत आहे.
(वाचा: UGC: देशातील सर्व महाविद्यालयांवर अंकुश ठेवणारे ‘यूजीसी’ नेमके आहे तरी काय?)