नवी दिल्ली : Apple ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आपली iPhone 14 मालिका लाँच केली होती. या मालिकेतील प्रो मॉडेल्समध्ये डिस्प्ले नॉच बदलून डायनॅमिक आयलँड फीचर सादर केलं. हेच फीचर आता Apple iPhone 15 मालिकेतील प्रो मॉडेल्ससह सर्व मॉडेल्समध्ये दिलं जाणार आहे. त्यामुळे iPhone 15 मधून डिस्प्ले नॉच पूर्णपणे काढून टाकला जाऊ शकतो. म्हणजेच, डायनॅमिक आयलँड फीचर नवीन आयफोन मालिकेसाठी गेमचेंजर ठरु शकते.
Apple ने आयफोन १४ सीरीजच्या प्रो फोन्ससह डायनॅमिक आयलँड फीचर सादर केलं, तर iPhone 14 आणि iPhone 14 Plus फक्त नॉचसह सादर केले गेले. आता कंपनी iPhone 15 मध्ये बेस व्हेरिएंट आयफोनला देखील डायनॅमिक आयलँड फीचरसह सादर केले जाऊ शकते. फोन कॉम्पॅक्ट करण्यासाठी आणि डिस्प्लेचा आकार वाढवण्यासाठी कंपनी हा बदल करू शकते.
iPhone 15 मध्ये खास फीचर्स
Apple ने डायनॅमिक आयलँडचे नाव फक्त त्या नॉचला दिले आहे जे पिल शेप (टॅब्लेट) होल पंच कटआउटसह येते. आयफोनचा फ्रंट कॅमेराही याच नॉचमध्ये आहे. आयफोन १५ सह टाइप-सी पोर्ट उपलब्ध होऊ शकतो. आयफोन १५ मालिका यूएसबी टाइप-सी पोर्टसह सुसज्ज असेल की नाही याबद्दल बऱ्याच काळापासून चर्चा केली जात आहे. ऑल-स्क्रीन अपग्रेड व्यतिरिक्त, कंपनी फोनचा चार्जिंग पोर्ट देखील बदलू शकते. असा दावा केला जात आहे की काही मॉडेल्समध्ये लाइटनिंग केबलऐवजी यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला जाऊ शकतो.

कॅमेरामध्ये अपग्रेड देखील उपलब्ध असेल
आयफोन १५ सीरीजचे सर्व फोन ४८ मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह ऑफर केले जाऊ शकतात. आयफोन १४ मालिकेतील पहिल्या दोन मॉडेल्समध्ये १२ मेगापिक्सेल कॅमेरा होता, तर प्रो मॉडेल ४८ मेगापिक्सेल कॅमेरासह लाँच करण्यात आला होता. आता कंपनी आयफोन १५ च्या बेस व्हेरिएंटसह कॅमेरा सेन्सर देखील अपग्रेड करू शकते.
वाचा : Virat Kohli Earbuds : कोहली वापरतो ‘या’ कंपनीचे इअरबड्स, किंमत आहे २० हजार, वाचा सविस्तर