CRPF GD कॉन्स्टेबल पदासाठी भरतीसाठी दहावीपास उमेदवारही करू शकणार अर्ज

CRPF GD Constable Recruitment 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) च्या माध्यमातून CRPF मध्ये जनरल ड्युटीसाठी (CRPF GD Constable) गट ‘C’ नॉन-राजपत्रित, (नॉन-मिनिस्ट्रियल फायटर) पोस्ट अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) च्या १.३० लाख पदांसाठी भरती केली जाणार आहे. ज्यासाठी लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीरात प्रसिद्ध केली जाणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना प्रसिद्ध केल्यानंतर रेक्ट किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर उमेदवारांना तुम्ही ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

ANI कडून गेल्या काही महिन्यांत आलेल्या बातमीत, CRPF कॉन्स्टेबलची भरती आयोगाच्या वतीने १.३० लाख पदांसाठी केली जाईल, असा दावा करण्यात आला होता. ज्यामध्ये १ लाख २५ हजार २६२ जागा पुरुष उमेदवारांसाठी ४ हजार ६६७ जागा महिला उमेदवारांसाठी असतील. मात्र, या भरतीची अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे, इच्छुक उमेदवार वेबसाइटवर अर्ज उपलब्ध होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आयोगाकडून अधिसूचना ऑगस्टमध्ये अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र, या अधिसूचनेबाबत आयोगाकडून अद्याप कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

(वाचा : Google Job Opportunity: गुगलमध्ये नोकरी मिळवायची आहे, मग या टॉप प्लेसमेंट टिप्स खास तुमच्यासाठी…)

वेतन विषयक :

निवडलेल्या उमेदवारांना लेव्हल-३ पे मॅट्रिक्समध्ये वेतनश्रेणीसह वेतन दिले जाईल. त्यानुसार त्यांना २१ हजार ७०० ते ६९ हजार १०० रुपयांपर्यंत मानधन मिळू शकते.

शैक्षणिक पात्रता:

कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील.

वयोमर्यादा :

वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ असावे.
शिवाय, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत नियमाप्रमाणे सवलत दिली जाईल.

असा भर येणार अर्ज :

  • सर्व प्रथम उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
  • वैयक्तिक तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
  • CRPF फॉर्म भरावा लागेल आणि कागदपत्रे अपलोड करून सबमिट करावी लागतील.
  • त्यानंतर शुल्क जमा करावे लागेल.
  • यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

(वाचा : IITB Suicide Case: “इतर विद्यार्थ्यांना JEE, Gate चे गुण विचाराल तर गोत्यात याल…” आयआयटी मुंबईकडून विद्यार्थ्यांना ताकीद)

Source link

ANICRPFCRPF GD Constablecrpf gd constable recruitment 2023crpf jawanrect.crpf.gov.inssc.nic.instaff selection Commission
Comments (0)
Add Comment