फोटो सौजन्य : @nitinchandrakantdesai
महाराष्ट्रातील दापोलीमध्ये जन्म झालेल्या नितीन देसाईंनी मुलुंडच्या वामनराव मुरंजन हायस्कुलच्या मराठी माध्यमाच्या शाळेतून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी फोटोग्राफीमधील शिक्षण घेण्यासाठी सर ज. जे. स्कूल ऑफ आर्ट्स आणि एल. एस. रहेजा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
(वाचा : Career BTech: १२वी नंतर इंजिनिअरिंग-बी. टेक करण्याच्या विचारात आहात; या अभ्यासक्रमांमुळे मिळू शकते लाखोंची नोकरी)
कालांतराने 2D आणि 3D world फॉरमॅट फोटोग्राफी सोबत कलादिग्दर्शनकडे (Arts Direction) आपला मोर्चा वळवला. २००३ मध्ये त्यांनी ‘देश देवी माँ आशापुरा’ च्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.
विविध कलाकृतींच्या माध्यमातून निर्माता, दिग्दर्शक, कलादिग्दर्शक, अभिनेता अशा विविध भूमिकांमधून नितीन देसाई यांनी कायम प्रेक्षकांची मने जिंकली. तर, विविध चित्रपटांच्या सेट्स चा अनुभव प्रेक्षकांनाही घेता यावा म्हणून त्यांनी कर्जतमध्ये तब्बल ५२ एकर परिसरात भव्य एन डी स्टुडिओचीही स्थापना केली.
चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार, तीन वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा फिल्मफेअर पुरस्कारही नितीन देसाई यांना मिळाला आहे.
(वाचा : Career In AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात करिअर करायचंय; या कोर्सेसनंतर मिळणार कामाची उत्तम संधी)