कॉमर्स घेतलंय? मग तुमच्यासाठी ‘या’ आहेत करिअर आणि नोकरीच्या खास संधी..

हल्ली ‘कॉमर्स’ घेण्याकडे विद्यार्थ्यांचा बराच कल वाढलेला दिसत आहे. पण दहावी नंतर कॉमर्स घेताना अनेकदा बँकेत नोकरी मिळणे किंवा सीए म्हणजेच चार्टर्ड अकाउंटंट होणे एवढेच पर्याय विद्यार्थ्यांच्या डोळ्यापुढे असतात. पण हल्ली कॉमर्स या फिल्डच्या कक्षा रुंदावल्या आहेत. ज्यामध्ये करियर आणि नोकरीचे अनेक पर्याय पुढे आले आहेत.

त्यामुळे तुम्ही कॉमर्स मधून शिक्षण घेतलं असेल किंवा घेण्याचा विचार करत असाल तर निर्धास्तपणे घ्या कारण कॉमर्स मधून पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यास पुढे अनेक पदव्युत्तर कोर्सेस खुले होतात आणि त्यातून नोकरीच्या संधीही मिळत जातात, तेव्हा पाहूया काय आहेत कॉमर्स मधले करियरचे पर्याय..

मार्केटिंग : सध्या मार्केटिंग क्षेत्राला खूप मागणी आहे. त्यामुळे कॉमर्समधून जर बारावी केली असेल किंवा पदवीचे शिक्षण घेतले असेल तर मार्केटिंग क्षेत्राशी संबधित बरेच कोर्सेस उपलब्ध आहेत. जे करून मार्केटिंग मधल्या अनेक नोकऱ्या खुल्या होतात.

बिजनेस मॅनेजमेंट : कॉमर्सचे विद्यार्थी हे बिजनेस मॅनेजमेंटच्या क्षेत्रात उत्तम यश मिळवू शकतात. हल्ली कॉर्पोरेट सेक्टर मध्ये बिजनेस मॅनेजमेंट करणाऱ्यांना मोठी मागणी आहे.

(वाचा: ‘मराठी’वर प्रभुत्व आहे.. मग दूरदर्शनमध्ये सुरु आहे महाभरती.. ‘या’ जागांसाठी करा अर्ज…)

ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट : मॅनेजमेंटचाच एक भाग म्हणजे एचआर म्हणजेच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आज सर्वच कंपन्यामध्ये एचआरची गरज आहे. त्यामुळे कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हि देखील नवी संधी आहे. कंपनीसाठी लागणारे नवे कर्मचारी शोधणे, त्यांची योग्यता तपासणे, त्यांना मार्गदर्शन करणे, कंपनीत रुजू करून घेणे ही कामे एचआर करत असतात.

इन्व्हेस्टर बँकर : आपला पैसा कुठे आणि कसा गुंतवावा हे अनेकांना कळत नाही. बऱ्याचदा हा निर्णय चुकला तर आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणूनच इन्व्हेस्टर बँकर ची मदत घेतली जाते. ते आपल्याला आपले पैसे कुठे गुंतवावे, त्यात वाढ कशी होईल याबाबत मार्गदर्शन करतात, ही देखील कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे.

रिसर्च ॲनॅलिस्ट : कॉमर्स करून जर तुम्ही मार्केटिंग, फायनान्स किंवा इकॉनॉमिक्सची पदवी मिळवली तर तुम्ही रिसर्च ॲनॅलिस्ट होऊ शकता. ऑपरेशन्स, इकॉनॉमिक्स, इक्विटी आदी क्षेत्रांत यांना चांगली संधी आहे.या क्षेत्रात पगारही लाखोंच्या घरात असतो.

ॲक्च्युअरी : हे एक नवे क्षेत्र कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी खुले झाले आहे. कॉमर्स करून जर तुमचे गणित (Maths), सांख्यिकी (Stats) आणि व्यवसाय व्यवस्थापन (Buiseness Management) या विषयांवर प्रभुत्व असेल तर हा सर्वाधिक उत्तम पर्याय आहे.

एंटरप्रेनरशिप : कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना व्यवसाय कसा करावा, तो कसा वाढवावा याचे उत्तम ज्ञान असते. तसेच व्यवसायातील कायदेशीर गोष्टी, आर्थिक खाचखळगे, करा संदर्भातल्या सामान्य माणसांना माहित नसलेल्या बाबी या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना माहीत असतात. त्याचाच उपयोग करून स्वतःचा व्यवसाय सुरु करता येऊ शकतो, ज्यामध्ये कंपन्यांना आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्याचे काम तुम्ही करू शकता.

(वाचा: मातृभाषेला कमी लेखू नका, ‘मराठी’ भाषेतही आहेत करियरच्या ‘या’ खास संधी..)

Source link

bank job openingcareer guidanceCareer NewsCareer News In Marathicommerce and businesscommerce collegecommerce jobcommerce studentsJob Newsjob opportunities for commerce
Comments (0)
Add Comment