जगातील टॉप १० प्रवेश परीक्षा, ज्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असायलाच हव्यात

युपीएससी (UPSC) :

UPSC ही भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. केंद्रीय लोकसेवा आयॊगाची नागरी सेवा परीक्षा ही कठीण परीक्षांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोक सेवा आयोग ही भारत संघ राज्याची निवड संस्था आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच संघ सेवेच्या गट ‘अ’ व गट ‘ब’ कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता घेतली जाणारी परीक्षा आहे.

​www.upsc.gov.in

युएसएमएलई, युएसए (USMLE, USA) :

युनायटेड स्टेस्टस मेडिकल लायसन्सिंग परीक्षा हे सर्वात कठीण परीक्षा आहे. हि परीक्षा राज्य वैद्यकीय मंडळ (FSMB) आणि राष्ट्रीय वैद्यकीय परीक्षक मंडळ (NBME) च्या वतीने घेतली जाते. युनायटेड स्टेट्स मेडिकल लायसन्सिंग एक्झामिनेशन (USMLE) ही युनायटेड स्टेट्समधील वैद्यकीय परवान्यासाठी अमेरिकन वैद्यकीय शाळा तसेच आंतरराष्ट्रीय वैद्यकीय शाळांच्या सर्व पदवीधरांसाठी आवश्यक असलेले मल्टी-स्टेप्स मूल्यमापनाही परीक्षा आहे.
​www.usmle.org

कॅलिफोर्निया बार एक्झाम, युएसए (California Bar Exam, USA) :

कॅलिफोर्निया बार परीक्षेत वकील परीक्षांचा समावेश असतो. सामान्य बार परीक्षेत पाच निबंध प्रश्न, मल्टीस्टेट बार परीक्षा (MBE) आणि एक परफॉर्मन्स टेस्ट (PT) असते. शिवाय, २०० MCQ प्रश्नांवर आधारित हि चाचणी असते.
​www.calbar.ca.gov

मेन्सा (MENSA) :

MENSA ही जगातील सर्वात जुन्या संस्थांपैकी एक आणि मनाची परीक्षा मानली जाते. ही एक ना-नफा संस्था आहे ज्यांना प्रमाणित, पर्यवेक्षित IQ किंवा इतर मान्यताप्राप्त बुद्धिमत्ता चाचणीवर ९८ टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळाले आहेत.
​www.mensa.org

आयआयटी-जेईई (IIT JEE) :

भारतातील आयआयटी-जेईई ही देशातील दुसरी सर्वाधिक कठीण परीक्षा आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. संयुक्त प्रवेश परीक्षा (Joint Entrance Examination : JEE) ही भारतातील विविध इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आयोजित ‘अभियांत्रिकी प्रवेश मूल्यांकन’ पद्धत आहे. ही परीक्षा जेईई-मेन आणि जेईई-अ‍ॅडव्हान्स्ड अशा दोन पातळीवर घेतली जाते.
​jeeadv.ac.in

जीआरई (युएसएकॅनडा) GRE (USACanada) :

Graduate Record Examinations ही जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक महत्त्वाची परीक्षा आहे. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमांच्या परदेशातील उच्च अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.
​www.ets.org/gre.html

गेट (GATE) :

ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE), ही अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते. Graduate Aptitude Test in Engineering ही ऑनलाइन परीक्षा असून भारत, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्येही घेतली जाते. ही भारतामध्ये घेण्यात येणारी एक प्रवेश परीक्षा आहे जी प्रामुख्याने तांत्रिक पदव्युत्तर कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अभियांत्रिकी आणि विज्ञानातील पदवीपूर्व विषयांच्या सर्वसमावेशक आकलनाची चाचणी असते. GATE भारतीय विज्ञान संस्था आणि रुरकी, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, चेन्नई (मद्रास) आणि मुंबई (बॉम्बे) येथील सात भारतीय तंत्रज्ञान संस्थांद्वारे राष्ट्रीय समन्वय मंडळ – GATE, उच्च शिक्षण विभाग यांच्या वतीने संयुक्तपणे आयोजित केले जाते.
​gate.iitkgp.ac.in

गाओकाओ (चीन) Gaokao (China) :

चीनमधील महाविद्यालयात प्रवेशासाठी Gaokao परीक्षा घेतली जाते. राष्ट्रीय महाविद्यालय प्रवेश परीक्षा (NCEE), ज्याला सामान्यतः gaokao म्हणून ओळखले जाते. चीन देशातील सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये पदवीपूर्व स्तरावरील प्रवेशासाठी हे आवश्यक आहे. ही परीक्षा कोणत्या प्रांतात आयोजित केली जाते त्यानुसार दोन किंवा तीन दिवसांच्या कालावधीत अंदाजे नऊ तास ही परीक्षा चालते. सर्व विद्यार्थ्यांनी चायनीज आणि गणित या विषयांवर परीक्षा देणे आवश्यक असते. शिवाय, परीक्षेच्या परदेशी भाषेच्या भागासाठी उमेदवारांना इंग्रजी, फ्रेंच, जपानी, रशियन, जर्मन किंवा स्पॅनिशमधून एक विषयनिवडण्याची मुभा असते. शिवाय, liberal arts किंवा Natural science पैकी एका विषयाची निवड करणेही बंधनकारक असते.
​www.chinaeducation.info

सीफा CFA (USCanada) :

चार्टर्ड फायनान्शियल अ‍ॅनालिस्ट (Chartered Financial Analyst) परीक्षा ही बिझनेस क्षेत्रातील सर्वात कठीण परीक्षा आहे. दरवर्षी १०० हून अधिक देशांतील लाखांहून अधिक अधिक उमेदवार CFA परीक्षा देतात.
​www.cfainstitute.org

सीसीआयई CCIE (US) :

Cisco Certified Internetworking Expert अर्थात CCIE परीक्षा ही वित्त क्षेत्रातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. US मध्ये ही परीक्षा घेतली जाते.
​www.cisco.com

Source link

California Bar Exam USACFAEntrance ExamsGaokaogateGREIIT JEEMENSAupscUSMLE USA
Comments (0)
Add Comment