नवी दिल्ली : Infinix GT 10 Pro Pre Order Starts : इन्फिनिक्स कंपनीने एक खास असा बजेट गेमिंग फोन ग्राहकांसाठी आणला असून हाच Infinix GT 10 Pro आज प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून दिला जाईल. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8050 प्रोसेसर, 8 GB पर्यंत RAM आणि 256 GB स्टोरेज आहे. AMOLED स्क्रीनसह फोनमध्ये 120 Hz चा रिफ्रेश रेट असे भन्नाट फीचर असून कॅमेराही 108MP असा दमदार आहे. या फोनची प्री-ऑर्डर आज दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर सुरू होईल. चला जाणून घेऊया या फोनबद्दल सविस्तर…
Infinix GT 10 Pro वर खास प्री-ऑर्डर ऑफर
Infinix GT 10 Pro ची किंमत २० हजारांपेक्षा कमी असू शकते. तसंच हा फ्लिपकार्टवरून ऑफरमध्ये प्री-ऑर्डर केला जाऊ शकतो. कंपनी पहिल्या ५ हजार ग्राहकांना मोफत प्रो गेमिंग गिफ्ट देणार आहे. यासोबतच निवडक बँक कार्डमधून पेमेंट केल्यास २ हजार रुपयांची झटपट सूट दिली जाईल. जुन्या फोनच्या एक्सचेंजवर आणखी २ हजार रुपयांची अतिरिक्त सूट दिली जाईल. याशिवाय ६ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय सुविधाही दिली जाणार आहे.

Infinix GT 10 Pro चे फीचर्स
हा ऱोन Android 13 वर काम करेल. यात ६.६७ इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz आहे. हा फोन MediaTek Dimension 8050 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम आणि 256 GB स्टोरेज आहे. यामध्ये स्टिरीओ ड्युअल स्पीकर देण्यात आले आहेत. हा एक गेमिंगसाठी तयार केलेला खास स्मार्टफोन असल्याने यात थर्मल मॅनेजमेंटसाठी खास कूलिंग सिस्टम आहे. Infinix GT 10 Pro मध्ये १०८ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि उर्वरित दोन २ मेगापिक्सेल सेन्सर आहेत. फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. यात Wi-Fi 6 ची सुविधा आहे.
वाचा: UPI ने पेमेंट करताना सारखं फेल होतंय? ‘या’ सोप्या स्टेप्स करा फॉलो