शाळेला सुट्टी मिळाली की विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावत नाही. शाळेत जाण्यापेक्षाही सुट्ट्या किती याची विद्यार्थ्यांना जास्त उत्सुकता असते. नुकताच जुलै महिना संपला आणि ऑगस्ट महिन्याची सुट्ट्यांची यादी जाहीर झाली. ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांना भरपूर सुट्ट्या असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भलतेच आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या पालकांसोबत छान पावसाळी सुट्टीवर सुद्धा जाऊ शकतात. तेव्हा पाहूया या सुट्ट्या किती आणि कोणत्या आहेत.
८ ऑगस्ट : ‘तेंदोंग लो रम फात’ हा सिक्कीम मधील मोठा सण आहे. लेप्चा समाजातील लोक हा सण प्रामुख्याने साजरा करतात. येत्या मंगळवारी म्हणजे ८ ऑगस्टला या सणाच्या निमित्ताने सिक्कीम आणि आजूबाजूच्या स्थानिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
९ ऑगस्ट : या दिवशी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने आदिवासीबहुल भागातील शाळांना सुट्टी दिली जाते. झारखंड सरकारने ९ ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
१२ आणि १३ ऑगस्ट : या दिवशी शनिवार आणि रविवार जोडून सुट्टी आली आहे. यादिवशी काही शाळांना रविवारी साप्ताहिक सुट्टी आहे, तर काही शाळांना दोन दिवस सुट्ट्या आहेत.
(वाचा: Career Guidance: करिअर निवडण्यापूर्वी या सहा गोष्टी आवर्जून करा! कधीही पश्चाताप होणार नाही..)
१५ ऑगस्ट : या दिवशी आपल्या देशाचा ‘स्वातंत्र्य दिन’ आहे . देशभरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो, तर शाळांमध्ये ध्वजारोहण आणि देशभक्तीपर कार्यक्रम असतात. पण हे कार्यक्रम सकाळच्या वेळेत असल्याने पुढे दिवसभर विद्यार्थ्यांना सुट्टी असते.
१६ ऑगस्ट : या दिवशी ‘पतेती’ म्हणजेच पारशी नववर्षानिमित्त काही राज्यांमध्ये शाळांना सुट्टी असते. महाराष्ट्रातही या दिवशी शाळांना सुट्टी आहे.
२० ऑगस्ट : या दिवशी रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे.
२१ ऑगस्ट : या दिवशी नागपंचमी चा सण आहे. भारतातील बहुतांश राज्यांमध्ये नागपंचमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. त्यामुळे काही राज्यांमध्ये सुट्टी असते, प्रामुख्याने उत्तरप्रदेश आणि बिहार मधील शाळांना या दिवशी सुट्टी आहे.
२७ ऑगस्ट : या दिवशी रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे.
२८ ऑगस्ट : या दिवशी ओणम आहे, केरळमधील लोक हा सण प्रामुख्याने साजरा करतात. त्यामुळे केरळ मधील शाळांना २८ ऑगस्ट रोजी सुट्टी आहे.
२९ ऑगस्ट : या दिवशी देखील केरळ मधील लोकांचा ‘तिरुवोनम’ हा उत्सव आहे. त्यामुळे केरळ मध्ये २७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
३० ऑगस्ट : या दिवशी रक्षाबंधनाचा सण आहे. हा सण भारतातील बहुतांश राज्यांमध्ये साजरा केला जातो. त्यामुळे याही दिवशी शाळांना सुट्टी आहे.
(वाचा: मातृभाषेला कमी लेखू नका, ‘मराठी’ भाषेतही आहेत करियरच्या ‘या’ खास संधी..)