एनसीसी ट्रेनिंगचा हा कोणता नवा प्रकार…? ठाण्यातील जोशी-बेडेकर आणि बांदोडकर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना होतेय बेदम मारहाण

Joshi-Bedekar and Bandodkar College Viral Video: ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर कॉलेजमध्ये एनसीसी सरावा दरम्यान विद्यार्थ्यांना बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कॉलेजमधील हा भयंकर व्हिडीओ पाहिल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांबरोबरच मुंबईमधील विविध कॉलेजांमध्ये खळबळ उडाली आहे. शिवाय, कॉलेजमधील या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

जोशी बेडेकर कॉलेजच्या मैदानात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना एकत्रितपणे एनसीसीचे प्रशिक्षण देण्यात येते. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्याना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणाचे पूर्व धडे दिले जातात. परंतु, या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्याकडून एखादी चूक झाल्यानंतर त्यांना दिल्या जाणाऱ्या अमानुष शिक्षा सध्या सर्वांच्या मनात आक्रोश निर्माण करते.

(वाचा : Acharya College Hijab Controversy: मुंबईतील कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर बंदी…? काय आहे कॉलेजची भूमिका)

नक्की काय आहे व्हिडीओमध्ये…?

कॉलेजमधील एनसीसी सरावाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये साचलेल्या साधारणतः ओणवे (पाण्यात डोकं आणि पायावर) उभे करण्यात आले आहे. सिनिअर विद्यार्थी हातात लाकडी दांडा घेऊन उभा आहे. ओणवा उभा केलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याची थोडीही हालचाल झाल्यास हा सिनिअर त्यांना लाकडी दांडक्याने अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे. ही मारहाण इतकी क्रूर आहे की विद्यार्थी अक्षरश: कळवळताना दिसत आहेत. कॉलेजमधल्याच एका जागरुक विद्यार्थ्याने मोबाईलमध्ये हा व्हिडिओ शूट केला असल्याची माहिती समोर येत आहे.

सुरुवातीला तक्रारीसाठी पिडीतांचाही पुढाकार नाही..

  • या सिनिअर विद्यार्थ्यांची इतकी दहशत आहे की पीडित किंवा ज्युनिअर विद्यार्थी त्यांना घाबरुन तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत.
  • कॉलेजमध्ये शिकायचे आहे किंवा करियअरच्या दृष्टीने विचार करत, भीतीपोटी विद्यार्थीच नव्हे तर पालकही पालकही समोर येऊन तक्रार करत करायला पुढे येत नाहीत.
  • बांदोडकर आणि जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्यांनीही शिक्षा झालेल्या विद्यार्थ्यांनी पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन केलं आहे. मात्र यानंतरही विद्यार्थी स्वत:हून पुढे येण्यास येत नाही आहेत.
  • त्यामळे या सिनिअर विद्यार्थ्याच्या दहशतीचा अंदाज येत आहे.

अनेक कॉलेजांमध्ये एनसीसीचे युनिट हेड हे कॉलेजमधील सीनियर विद्यार्थीच असतात. परंतु, जोशी-बेडेकर कॉलेजमधील हा प्रकार पाहिल्यानंतर एनसीसी नकोच अशी भूमिका घेण्याच्या विचारात विद्यार्थी आहेत.

सिनिअर विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शिक्षा दिली जाते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता या सिनिअर विद्यार्थ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जोशी-बेडेकर कॉलेजच्या प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचं सुचित्रा नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा देणाऱ्या सिनिअरवर लवकरात-लवकर कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. शिवाय, यापुढे कॉलेजमध्ये असे काही प्रकार घडू नये म्हणून कॉलेज प्रशासन अधिक दक्ष राहून काळजी घेईल अशी प्रतिक्रियाही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

Source link

bandodkar collegecollege ncc trainingjoshi-bedekar collegenational cadet corpsnccncc studentsncc training videoncc training viral videostudents are being brutally beatenviral video
Comments (0)
Add Comment