१२ वी पास विद्यार्थ्यांसाठी कर्मचारी निवड आयोगात महाभारती.. एक हजाराहून अधिक जागा रिक्त…

SSC Stenographer Recruitment 2023: जर तुमची बारावी झाली असेल आणि केंद्र सरकारच्या एखाद्या आयोगात काम करायची इच्छा असेल तर तुमच्या साठी ही मोठी संधी असणार आहे. कारण केंद्राच्या कर्मचारी निवड आयोगामध्ये सध्या महाभरती सुरु आहे. देशभरातील विविध ठिकाणच्या एकूण १२०७ जागा या आयोगातून भरल्या जाणार आहेत.

कर्मचारी निवड आयोगाने ‘स्टेनोग्राफर’ पदासाठी ही भरती जाहीर केली असून ‘क’ , ‘ड’ स्तराच्या जागा रिक्त आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commision) ‘स्टेनोग्राफर’ या पदासाठी नेमकी पात्रता काय, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज कसा करावा आणि तो करण्याची शेवटची तारीख याबाबत जाणून घेऊया..

(वाचा: School Holidays In August: विद्यार्थ्यांची मज्जा! ऑगस्ट महिन्यात शाळांना सुट्ट्याच सुट्ट्या.. ‘इतके’ दिवस शाळा बंद..)

स्टेनोग्राफर एकूण रिक्त पदे : १२०७

पदांची वर्गवारी आणि रिक्त पदे:

स्टेनोग्राफर गट क (Grade C) : ९३
स्टेनोग्राफर गट ड (Grade D) : १११४

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १२ वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : गट की – १८ ते ३० वर्षे आणि गट ड – १८ ते २७ वर्षे.
(ओबीसी उमेदवारांसाठी ३ वर्षांची सूट तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्षांची सूट)

अर्जासाठी शुल्क :
खुला/ ओबीसी : १०० रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD यांच्यासाठी शुल्क नाही.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतातील विविध शाखांमध्ये (तपशील अधिकृत संकेतस्थळावर)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ ऑगस्ट २०२३
अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.nic.in/
अर्ज आणि नोकरीचे सर्व तपशील (या) या लिंक वर उपलब्ध आहे.

(वाचा: UGC: देशातील सर्व महाविद्यालयांवर अंकुश ठेवणारे ‘यूजीसी’ नेमके आहे तरी काय?)

Source link

Career NewsCareer News In Marathicentral government jobsjob for 12th passjob in govermentJob Newsjob news marathi newsstaff selection commission recruitmentstenographer jobs
Comments (0)
Add Comment