भारतीय नौदलात एसएससी आयटी एक्झिक्युटिव्हच्या पदांवर दहा वर्ष कामाची संधी; आजच करा अर्ज

Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) IT साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी १९९९ ते जानेवारी २००४ दरम्यान जन्मलेले उमेदवार भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदभरतीमधील जागांसाठी अर्ज करू शकतात. या भारतामधील पिचून आणि पात्र उमेदवारांना २० ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

भारतीय नौदलाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सादर भरतीदरम्यान एकूण ३५ पदे भरली जाणार आहेत. इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज भरण्याची पद्धत आणि आवश्यक कागदपत्रांविषयी अधिक माहिती नौदलाने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली आहे.

या भरतीप्रक्रियेतून निवड केल्या जाणाऱ्या उमेदवारांना एमएससी(MSc) / बीई(BE) / बीटेक (BTech) / एमटेक (MTech) (कम्प्युटर सायन्स / कम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग / कम्प्युटर इंजिनिअरिंग / सूचना प्रौद्योगिकी / सॉफ्टवेयर सिस्टम / साइबर सुरक्षा / सिस्टम प्रशासन आणि नेटवर्किंग / कम्प्युटर सिस्टम आणि नेटवर्किंग / डेटा अॅनालिटिक्स / आर्टिफिशियल इंटेलिजेंस)या आणि अशा विविध विभागांच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

भारतीय नौदलावणे प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या पदांसाठीकेल्या जाणाऱ्या नियुक्त्या १० वर्षांसाठी करण्यात येणार आहेत. शिवाय, उमेदवारांच्या कामगिरीच्या आधारे त्यांच्या कार्यकाळात वाढ केली जाऊ शकते. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भारतीय नौदलाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचना वाचणे अत्यंत आवश्यक आहे.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या अर्जात (फॉर्ममध्ये) भरलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळ्यास त्या उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. शिवाय, चुकीची माहिती किंवा बनावट कागदपत्रे वापरणाऱ्या उमेदवारांचे अर्ज निवड प्रक्रियेच्या कोणत्ययी पायरीवर फेटाळण्यात येतील अशी सूचना इंडियन नेव्हीच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.

एखादया उमेदवाराची आवड झाल्यानंतर त्याने बनावट कागदपत्र अथवा माहिती सादर केली असल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराला नोकरीवरून काढून टाकले जाईल. यासोबतच, त्याच्यावर कायदेशीर कारवाईही करण्यात येईल.

एसएससी आयटी एक्झिक्युटिव्ह भरतीसाठी अर्ज कसा करावा

  • सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  • त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
  • वापरकर्ता आयडी तयार करा.
  • यानंतर लॉगिन करून आयटी एक्झिक्युटिव्हचा फॉर्म भरा.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
  • यानंतर, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Source link

indian navyindian navy jobsIndian Navy RecruitmentIndian Navy Recruitment 2023भारतीय नौदलभारतीय नौदल भरती
Comments (0)
Add Comment