या फोनच्या १२८ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत ६९,९०० रुपये आहे. यावर ११ टक्के डिस्काउंटसह हा फोन ६१,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवर याला ५ पैकी ४.७ रेटिंग असल्यामुळे हा एक भन्नाट फोन आहे हे नक्की आहे. याशिवाय यावर खास अशा बँक ऑफर आणि EMI ऑफर्सही आहेत. यातील बँक ऑफर्सबद्दल बोलायचे तर, फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर ५ टक्के कॅशबॅक दिलं जाईल. HDFC बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास दोन हजारांची अतिरिक्त सूट दिली जाईल. नो कॉस्ट ईएमआय अंतर्गत, दरमहा २,५८४ रुपये देऊन तुम्ही फोन खरेदी करु शकता.
एक्सचेंज ऑफरने मिळवा तगडं डिस्काउंट
यात सर्वाधिक पैसे हे एक्सचेंज ऑफरच्या मदतीने वाचवता येतील. तुम्ही जुना फोन एक्सचेंद केल्यास थेट ३८,६०० रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. तुमच्याकडे जुना फोन असेल तर तुम्ही तो एक्सचेंज करू शकता. तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास, हा नवीन फोन फक्त २३,३९९ रुपयांना मिळेल. यानंतर, HDFC कार्डने पेमेंट केल्यानंतर, २,००० रुपयांच्या ऑफनंतर फोन २१,३९९ रुपयांनाही घेता येऊ शकतो.
iPhone 13 चे फीचर्स
या फोनमध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये A15 बायोनिक चिपसेट डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच ड्युअल रेअर कॅमेरा देखील आहे. याचा पहिला सेन्सर १२ मेगापिक्सेलचा आहे. दुसरा ही १२ मेगापिक्सेलचा आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.
वाचा :सावध व्हा! आजकाल मोबाईल नंबर आणि लोकेशनच्या मदतीने होत आहे ऑनलाईन फ्रॉड, वाचा नेमकं प्रकरण काय?