अशीच बड्या पगाराची नोकरी रायपूरच्या एका मुलीने कॅम्पस सिलेक्शन मध्ये मिळवली आहे. या विद्यार्थिनीने सगळेच रेकॉर्ड मोडले आहेत. आयआयटी, आयआयएम किंवा एनआयटी सारखी मोठी डिग्री न करता तिने चक्क ८५ लाखांचे पॅकेज मिळवले आहे.
ही मोठी आश्चर्याची बाब असून सर्वत्र त्याची चर्चा होत आहे. कारण, आयआयटी, आयआयएम मधल्या विद्यार्थ्यांना लाखो- कोटींचे पगार मिळतात हे आता सर्वांनाच ठाऊक आहे, पण अशी कोणतीही पदवी न घेता छत्तीसगड मधील रायपूरमध्ये राहणाऱ्या राशी बग्गा या विद्यार्थिनील एका कंपनीकडून ८५ लाखांच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे.
(वाचा: Career Guidance: करिअर निवडण्यापूर्वी या सहा गोष्टी आवर्जून करा! कधीही पश्चाताप होणार नाही.. )
इंटरनॅशनल इंस्टीट्यूट ऑफ इंफोर्मेशन टेक्नोलॉजी, नवे रायपुर (IIIT-NR) मधील या विद्यार्थिनीने कॅम्पस सिलेक्शनमध्ये ८५ लाखांच्या नोकरीची ऑफर मिळाली आहे. राशीने इंजिनियरिंग केले असून तिला कंपनीकडून वार्षिक ८५ लाख रुपये वेतन देणार आहे. या आधीही राशीला एका कंपनीने ८५ लाखांची ऑफर दिली होती पण त्यावेळी तिने स्वतःला आणखी सिद्ध करण्यासाठी ही नोकरी नाकारली आणि अखेर तिला पुन्हा एकदा ८५ लाखांची नोकरी मिळाली . याच कंपनने गेल्यावर्षी याच इंस्टीट्यूट मधील विद्यार्थ्याला ५७ लाखांचे पॅकेज दिले होते.
कोण आहे राशी बग्गा?
राशी ही मूळची छत्तीसगड मधील बिलासपुर मध्ये राहणारी आहे. तिचे वडील शरणजीत बग्गा हे सरकारी शाळेत शिक्षक आहेत. तर आई गृहिणी आहे. राशी आता ‘IIIT-NR’ मधून इंजिनियर झाली आहे. इंजिनियर होण्याची प्रेरणा तिला तिच्या भावाकडून मिळाली आहे. ती शाळेत असल्यापासून प्रचंड होती. पण आज ती ज्या पदावर पोहोचली आहे ते केवळ तिच्या वडिलांमुळे असा ती मानते, कारण इथे पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनीच तिला सतत पाठिंबा दिला . राशी इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षापासूनच इंटरव्हूव ची तयारी करत होती. म्हणूनच तिला हे यश मिळवता आले.
(वाचा: UGC: देशातील सर्व महाविद्यालयांवर अंकुश ठेवणारे ‘यूजीसी’ नेमके आहे तरी काय?)