रेल्वेमध्ये मेगाभरती! लोको पायलट, ट्रेन मॅनेजर सह १३०० पदे भरणार..

भारतीय रेल्वे मध्ये काम करणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळे रेल्वे भरतीसाठी अनेकजण वर्षभर तयारी करत असतात. रेल्वेमध्ये दर काही वर्षांनी महाभरती होत असते. नुकतीच रेल्वे प्रशासनाने एक घोषणा केली आहे. ज्यामध्ये सेंट्रल रेल्वेसाठी महाभरतीची जाहिरात देण्यात आली आहे.

ज्युनिअर इंजिनिअर, लोको पायलट, टेक्निशियन आणि ट्रेन मॅनेजर या पदांसाठी ही महाभरती असणार आहे. एकूण १३०३ पदांसाठी असलेली ही भरती केवळ सेंट्रल रेल्वे साठी असणार आहे. विशेष म्हणजे ही भरती केवळ GDCE (General Departmental Competitive Examination) कोट्यातील उमेदवारांसाठी आहे. म्हणजे जे उमेदवार पहिल्यापासून रेल्वेमध्ये वेगवगेळ्या पदावर कार्यरत आहे अशा रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ही अंतर्गत भरती आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले असून सेंट्रल रेल्वेच्या rrccr.com या अधिकृत वेबसाईटवरुन तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. तर २ सप्टेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.

(वाचा: Career Guidance: करिअर निवडण्यापूर्वी या सहा गोष्टी आवर्जून करा! कधीही पश्चाताप होणार नाही..)

कोणाला करता येणार अर्ज?

ही भरती GDCE कोट्यातील असल्याने या पदांसाठी अर्ज करणारी व्यक्ती मध्य रेल्वेची नियमित कर्मचारी असणे आवश्यक आहे. तसेच, १ ऑगस्ट २०२१ पूर्वी या कर्मचाऱ्याची नियुक्ती झालेली असणे गरजेचे आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे, किंवा ज्यांची बदली मध्य रेल्वेमधून दुसरीकडे झाली आहे; त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.

एकूण जागा आणि पदे

असिस्टंट लोको पायलट – ७३२
टेक्निशिअन – २५५
ज्युनिअर इंजिनिअर – २३४
गार्ड/ट्रेन मॅनेजर – ८२

शैक्षणिक पात्रता

असिस्टंट लोको पायलट – NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त संस्थांमधून मॅट्रिक्युलेश/SSLC आणि ITI किंवा त्याऐवजी एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनिअरिंगचा तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक.
टेक्निशिअन – NCVT/SCVT च्या मान्यताप्राप्त संस्थांमधून मॅट्रिक्युलेश/SSLC आणि ITI सर्टिफिकेट आवश्यक.
ज्युनिअर इंजिनिअर – कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बेसिक स्ट्रीमच्या कोणत्याही सब स्ट्रीममध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा आवश्यक.

वयोमर्यादा

यूआर प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४२ वर्षे वयोमर्यादा आहे. तर, ओबीसी प्रवर्गासाठी ४५ वर्षं आणि एससी/एसटी प्रवर्गासाठी ४७ वर्षं वयोमर्यादा आहे.

ऑनलाईन अर्जासाठी सेंट्रल रेल्वेच्या rrccr.com ही वेबसाईट उपलब्ध आहे तर ”या” लिंकवर भरती फाॅर्मचे तपशील आहेत.

(वाचा: UGC: देशातील सर्व महाविद्यालयांवर अंकुश ठेवणारे ‘यूजीसी’ नेमके आहे तरी काय?)

Source link

career news marathicentral railwaycentral railway jobcentral railway recruitmentjob news in marathirailway job newsrailway news mumbairailway recruitmentrailway recruitment notification
Comments (0)
Add Comment