गोपीचंद पडळकरांचा पोलिसांना चकवा; भल्या पहाटे भरवली बैलगाडा शर्यत

सांगलीः बैलगाडा शर्यतीसाठी बंदी असतानाही भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यत पार पाडून दाखवली आहे. आटपाटी तालुक्यातील निंबवडे- वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान असलेल्या पठारावर पहाटे शर्यती झाल्या असल्याचं सांगण्यात येत आहे.

आटपाटी तालुक्यातील झरे या गावी बैलगाडा शर्यत होणार असल्याचं सांगत गोपीचंद पडळकरांनी सरकारला आव्हाव दिलं होतं. ही शर्य होऊ नये म्हणून पोलिस प्रशासन सज्ज झाले होती. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिसांनी कटेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शर्यत स्थळावरही पोलिस उपस्थित होते. मात्र, पोलिसांना चकवा देत पडळकरांनी रातोरात दुसऱ्या जागेवर मैदान तयार करत शर्यत भरवली आहे.

वाचाः …तर जवखेड्याच्या मारुतीच्या पारावर हरिपाठ करत बसलो असतो: दानवे

गोपीचंद पडळकरांनी पोलिसांना चकवा देत एका रात्रीत पाच किलोमीटरचा दुसरा ट्रॅक बनवून बैलगाडा शर्यती पार पडल्या. आटपाटी तालुक्यातील निंबवडे- वाक्षेवाडी गावांच्या दरम्यान या शर्यती झाल्या. या शर्यतीत पाच ते सहा बैलगाजा चालक आणि मालक सहभागी झाले होते, अशी माहिती समोर येतेय. गोपीचंद पडळकरांनी भरवलेल्या बैलगाडा शर्यतीवर पोलिस प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचाः माथेरानच्या मिनी ट्रेनची आंतरराष्ट्रीय चढाई; युनेस्कोसाठी नामांकन

Source link

Bullock Cart Racebullock cart race in indiabullock cart race in maharashtrabullock cart race videoGopichand Padalkargopichand padalkar news todaymla gopichand padalkar latest news
Comments (0)
Add Comment