पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर; ऑगस्ट अखेरीस पहिली सत्र परीक्षा..

राज्यातील विद्यापीठांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२३-२४ सुरु झाले आहे. विद्यार्थीही उन्हाळी सुट्ट्याची मजा संपवून चांगलेच अभ्यासाला लागले आहेत. अनेक कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये चाचणी परीक्षा देखील सुरु झाल्या आहेत. अशातच पुणे विद्यापीठाने आपले शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये वर्षभरातील परीक्षांच्या वेळापत्रकांचा समावेश आहे.
कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय उच्च शिक्षणात उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर परीक्षाही ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आल्या. करोना नंतर सुरक्षिततेची काळजी म्हणून बऱ्याच विद्यापीठांनी ऑनलाईनच परीक्षा घेतल्या. पण आता ही घडी पूर्ववत करण्याकडे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा कल आहे. त्यामुळे विद्यापीठाचे कामकाज पूर्ववत पद्धतीनेच करावे अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२३-२४चे वेळापत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यापीठाचे पहिले सत्र ऑगस्टच्या अखेरीस म्हणजे २१ ऑगस्ट ते १६ डिसेंबर दरम्यान असणार आहे तर दुसरे सत्र १ जानेवारी ते १८ मे या कालावधीत घेण्यात येणार आहे.
विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाने याबाबत प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानव्यता, वाणिज्य आणि व्यवस्थापन, आंतरविद्याशाखीय अभ्यास या विद्याशाखांतर्गत असलेल्या विभागातील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी सामाईक प्रवेश परीक्षा यापूर्वीच घेण्यात आली आहे. या परीक्षेनंतर प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने विद्यापीठाने शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यात विद्यापीठाने हिवाळी आणि उन्हाळी सुट्यांचा कालावधीही नमूद केला आहे.

असे असेल पुणे विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष २०२३-२४:

पहिले सत्र : २१ ऑगस्ट ते १६ डिसेंबर

दुसरे सत्र : १ जानेवारी ते १८ मे २०२४

हिवाळी सुट्टी : १८ ते ३० डिसेंबर

उन्हाळी सुट्टी : १९ मे ते ३० जून २०२४

Source link

Career Newscareer news marathiEducation News in Marathiexam newsexam time tablePune newsPune Universitypune university academic yearPune University ExamsStudent news
Comments (0)
Add Comment