अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केलेल्या बालकलाकार एच. एस. कीर्तनाने (HS Kirtana) हिने झगमगते विश्व सोडून UPSC च्या तयारीसाठी आपला वेळ दिला. सलग पाचवेळा अपयश आल्यानंतरही हार न मानता कीर्तनाने सहाव्या प्रयत्नात UPSC ची परीक्षा पास केली. तिच्या याच जिद्दीमुळे ती आज IAS अधिकारी म्हणून काम करते आहे.
(वाचा : Acharya College Hijab Controversy: मुंबईतील कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावर बंदी…? काय आहे कॉलेजची भूमिका)
कन्नड चित्रपट विश्वातील अभिनेत्री एच. एस. कीर्तनाने सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली. त्यांची पहिली पोस्टिंग कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात सहाय्यक आयुक्त म्हणून झाली होती.
या अभिनेत्रीने २०११ मध्ये पहिल्यांदाच कर्नाटक प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली होती. या परीक्षेत चांगले गन मिळवून गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने दोन वर्षे KAS (Karnataka Administrative Service) अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर तिने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. २०१३ मध्ये पहिल्यांदा UPSC CSE (Civil Services Examination) परीक्षेला बसली. मात्र, पाच प्रयत्नांनंतर तिला अखेर २०२० मध्ये या परीक्षेमध्ये यश मिळाले. संपूर्ण भारतातून All India Rank (AIR Rank) १६७ वी रँक मिळवून ती IAS अधिकारी बनली आहे.
(वाचा : World’s Top 10 Entrance Exams: जगातील टॉप १० प्रवेश परीक्षा, ज्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असणे गरजेचेच…)