ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट‘क’मधील सरळसेवेची तब्बल १९ हजार ४६० पदे भरण्याचा निर्णय सरकारने घेतला असून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत आरोग्य विभागातील १०० टक्के आणि इतर विभागांतील ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.
राज्यातील ३४ जिल्हा परिषदांसाठी ही भरती होणार असून ५ ते २५ ऑगस्टदरम्यान उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन हा अर्ज करावा लागेल.
(वाचा: Mumbai University: मुंबई विद्यापीठात राष्ट्रीय परिसंवाद आणि प्रदर्शन! चुकूनही चुकवू नये असा आहे विषय…)
कसा करावा अर्ज
जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे तर २५ ऑगस्ट ही तेज दाखल करण्याची शेवटचीतारीख असेल.
त्या-त्या पदासाठीची पात्रता वेगळी असून त्याचे तपशील संकेतस्थळावर नमूद केले आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय ऑनलाईन परीक्षा होणार आहे. यासाठी खुल्या वर्गाकडून १००० रुपये तर आरक्षित वर्गाकडून ९०० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे
(वाचा: Career Guidance: करिअर निवडण्यापूर्वी या सहा गोष्टी आवर्जून करा! कधीही पश्चाताप होणार नाही..)