‘ही तर बुरसटलेली तालिबानी मानसिकता’; त्या घटनेवरुन फडणवीसांची शिवसेनेवर टीका

नागपूरः ‘ज्यांनी स्मारकाचे शुद्धीकरण केले त्यांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता,’ अशी जहरी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शिवसेनेवर केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मारकास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भेट देऊन वंदन केल्यानंतर काही तासांतच शिवसेनेतर्फे स्मारकाचे शुद्धीकरण करण्यात आले. या घटनेनंतर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केलं आहे.

‘त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. एकप्रकारे बुरसटलेली तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वाचाः
बलात्काराच्या आरोपामुळं युवकाची कोठडीत आत्महत्या?; नातेवाईकांनी केला गंभीर आरोप

‘ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून त्यांच्या समाधीवर कोणी जात असेल, तर ती समाधी अप्रवित्र झाली असं सांगता. ही कृती अयोग्य आहे,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

वाचाः अडवण्याची भाषा करणारे गोमूत्रवर आले…; राणे बंधूंची शिवसेनेवर टीका

स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण

नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीची भावना होती. त्यामुळे राणे तेथून गेल्यानंतर स्मृतिस्थळी दुग्धाभिषेक करण्यात आला; तसेच गोमूत्राने शुद्धीकरण केले गेले. स्मृतिस्थळाची देखभाल करणारे अप्पा पाटील यांनी हे शुद्धीकरण केले.

वाचाः गोपीचंद पडळकरांचा पोलिसांना चकवा; भल्या पहाटे भरवली बैलगाडा शर्यत

Source link

balasaheb thackeray smriti sthaldevendra fadanvis on shivsenanarayan rane on shivsenaबाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळशिवसैनिकस्मृतीस्थळाचे शुद्धीकरण
Comments (0)
Add Comment