पावसानं घात केला! समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; १३ मजूरांचा मृत्यू

बुलडाणाः सिंदखेड राजा-मेहकर दुसरबीड गावानजीक तढेगाव फाट्याजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १३ मजूरांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर, तीन जण गंभीर जखमी आहेत.

समृद्धी महामार्गाच्या कामावरील टिप्परला अपघात होऊन १३ मजूर ठार झाले आहेत. सदर टिप्पर हा लोखंडी रॉडने भरलेला होता व त्यावर १६ मजूर प्रवास करीत होते. यात ३ मजुरांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलं आहे.

वाचाः ‘ही तालिबानी मानसिकता’; त्या घटनेवरुन फडणवीसांची शिवसेनेवर टीका

या अपघातात मृत्यू झालेल्या मजूर हे परप्रांतीय असून मध्य प्रदेश व बिहार या राज्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेतील मृतांची ओळखी अद्याप पटली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक व पोलिस घटनास्थळावर दाखल झाले आहे. अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालं.

वाचाः मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न; आठवड्याभरातील दुसरी घटना

समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मजूरांना घेऊन हे टिप्पर निघाले होते. दुसरबीडजवळील ताडगावमध्ये हा टिप्पर उलटल्यानं भीषण अपघात घडला आहे. या टिप्परमध्ये १६ मजूर होते. टिप्पर उलटल्याने झालेल्या अपघातात १३ जण जागीच ठार झाले आहेत. तसंच, मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पाऊस चालू असल्याने वळणमार्गावर चालकाला गाडीवर नियंत्रण मिळवता आलं नाही त्यामुळे हा अपघात घडला आहे.

वाचाः बलात्काराचा आरोपामुळं युवकाची कोठडीत आत्महत्या?; नातेवाईकांनी केला गंभीर आरोप

Source link

accident in buldhanaaccident on samruddhi mahamargworker diedबुलडाण्यात अपघातमजुरांचा अपघात
Comments (0)
Add Comment