कारण या भरतीसाठी उमेदवार, नोकरीसाठी सोयीचे पडेल म्हणून आपला जिल्हा पाहून अर्ज भारतात शिवाय संधी हातची जायला नको म्हणून नजीकचा जिल्हा पाहून त्याही परिषदेत नोकरीसाठी अर्ज करतात. इथे नाही नोकरी मिळाली तर तिथे तरी मिळेल या भावनेने उमेदवार एकाहून अधिक परिषदेसाठी अर्ज दाखल करतात. जर तुम्हीही असेच काही करत असाल तर थांबा, कारण असे कृत्य तुमच्या हातातली नोकरीची संधी हिरावून घेऊ शकते.
कारण या भरतीसाठी सर्व ठिकाणी एकाच कालावधीत पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार आहे. म्हणूनच एकाच पदासाठी एकापेक्षा अनेक जिल्हा परिषदेत अर्ज करू नये. कारण परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र हे संगणकीकृत यंत्रणेमार्फत तयार होणार असल्याने एका उमेदवाराला एकाच ठिकाणी परीक्षा देता येणार आहे. समजा एखाद्याने अर्ज भरला तरी दुसऱ्या परिषदेसाठीचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे उमेदरवाराचे भरलेले प्रवेश परीक्षा शुल्क नाहक वाया जाऊन आर्थिक नुकसान होऊ शकते आणि तसे झाल्यास त्याला जिल्हापरिषद जबाबदार राहणार नाही. कारण त्यांनी ‘एका उमेदवाराने एका संवर्गासाठी एकाच परिषदेत अर्ज करावा. दोन अर्ज भरले असल्यास दुसरा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे.’ ही अट आधीच अधोरेखित केली आहे.
म्हणून अर्ज भरताना या अटीची विशेष काळजी घ्या. आणि दुसरे म्हणजे अर्ज दाखल केल्यानंतर परीक्षेच्या तारखेबाबत सातत्याने जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पाहण्याची सूचना प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जेणेकरून उमेदवारांना परीक्षेचे सर्व तपशील मिळत राहतील.
(वाचा: Career Guidance: करिअर निवडण्यापूर्वी या सहा गोष्टी आवर्जून करा! कधीही पश्चाताप होणार नाही..)
भरतीविषयी…
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये ‘क’ वर्गातील पदे भरण्यात येत आहेत. ३४ जिल्हा परिषदांमध्ये एकूण १९ हजार ४६० पदे भरली जाणार आहेत. अर्ज नोंदणी सुरु झाली असून इच्छुक उमेदवारांनी २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. यामध्ये आरोग्य विभागातील १०० टक्के आणि इतर विभागांतील ८० टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. ग्रामविकास विभागांतर्गत ही भरती होणार असून ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे.
या पदांसाठी होणार भरती…
आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ सहाय्यक (लिपिक), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिगमन, लघुलेखक (उच्चश्रेणी), वरिष्ठ सहायक (लिपिक), वरिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पर्यवेक्षिका आणि यासह अन्य काही पदांचा समावेश आहे.
कसा करावा अर्ज?
जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे.
अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे तर २५ ऑगस्ट ही अर्ज दाखल करण्याची शेवटचीतारीख असेल.
त्या-त्या पदासाठीची पात्रता वेगळी असून त्याचे तपशील संकेतस्थळावर नमूद केले आहेत.
राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकाच कालावधीमध्ये पदनिहाय ऑनलाईन परीक्षा होणार आहे. यासाठी खुल्या वर्गाकडून १००० रुपये तर आरक्षित वर्गाकडून ९०० रुपयांचे शुल्क आकारले जाणार आहे.
(वाचा: ZP Recruitment 2023: महाभरती! राज्यातील 34 जिल्हा परिषदा आणि १९ हजार जागा.. असा करा अर्ज..)