SPPU च्या परीक्षा विभागाने यंदा जलद कार्यपद्धती राबवत लवकर निकाल जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला.होता. मात्र काही कॉलेजांनी त्यांच्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना दिले गेलेले अंतर्गत मूल्यमापनासहित विविध गुण ऑनलाइन पद्धतीने विद्यापीठाकडे सबमिट न केल्याने गोंधळ उडाला आहे. त्यामुळे अर्धवट गुणांसहित विद्यार्थ्यांचा निकाल कसा जाहीर करावा…? असा प्रश्न SPPU च्या परीक्षा विभागापुढे निर्माण झाला आहे.
(वाचा : IIM Act 2023: आयआयएम २०२३ च्या विधेयकला लोकसभेने मंजूर; अंमलबजावणीनंतर होणार हे पाच महत्त्वपूर्ण बदल)
कॉलेजांकडून मांडण्यात आलेल्या विविध सबबी लक्षात घेता, विद्यापीठाने कॉलेजांकडून गुण भरावयाचे राहून गेले आहेत, त्या कॉलेजांमधील निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. मात्र, उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागावतीने सांगण्यात आले आहे.
शिवाय, सदर विद्यापीठाशी संलग्नित अथवा या विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजांमधील विद्यार्थ्यांचे कोणत्ययी प्रकारचे नुकसान होऊ नये, यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे गुण, बहि:स्थ मूल्यमापनाचे गुण आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण न भरलेल्या कॉलेजांना ऑनलाइन पद्धतीने हे गुण नोंदवण्यासाठी लिंक खुली करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यासाठी कॉलेजांना ८ ते १० ऑगस्ट हा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर कोणतीही कॉलेजांना गुण नोंदणीसाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
(वाचा : BARC Recruitment 2023: भाभा अणु संशोधन केंद्रात १०५ पदांसाठी भरती सुरु; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी)