चित्रपटाला सुट्टीचा म्हणजेच स्वातंत्र्यदिनाचा पूर्ण फायदा पाचव्या दिवशी मिळाला. यामुळेच ‘गदर २’ने मंगळवारी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. चित्रपटाने मंगळवारी ओपनिंग आणि रविवारपेक्षा जास्त कमाई केली असे क्वचितच घडले आहे. पण यावेळी गदर २ हे करुन दाखवले. सनी देओलच्या चित्रपटाने पाचव्या दिवशी जवळपास ५५.५ कोटींची कमाई करून बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे.
मंगळवारी सर्वाधिक कमाई, सुट्टीचा पूर्ण लाभ
बॉक्स ऑफिस रेकॉर्ड किपिंग साइट Sacnilk नुसार, चित्रपटाने आगाऊ बुकिंगमुळे पहिल्या दिवशी शुक्रवारी ४०.१ कोटी रुपयांची कमाई केली. दुस-या दिवशी शनिवारी ४३.०८ कोटी आणि रविवारी तिसर्या दिवशी ५१.७ कोटी कमावले. चित्रपटाच्या कमाईच्या विक्रमात हा आकडा कदाचित सर्वाधिक असेल असे वाटले होते. पण असे झाले नाही. सोमवारी ३८.७० कोटींची कमाई केली. रविवारच्या तुलनेत हे आकडे नक्कीच २५.१५ % कमी होते, पण बॉलिवूडच्या चमकदार चित्रपटांच्या सोमवारच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, ‘गदर २’ ने आश्चर्यकारक कामगिरी केली. पाचव्या दिवशी सुट्टीचा पुरेपूर फायदा चित्रपटाला मिळेल, अशी अपेक्षा होती आणि ती मिळालीही. ५ दिवशी या चित्रपटाने २२९.०८ कोटींची कमाई केली आहे.
संध्याकाळच्या शोमध्ये सर्वाधिक गर्दी दिसून आली
असे सांगितले जात आहे की १५ ऑगस्ट रोजी चित्रपटाची व्याप्ती एकूण ८७.५३ % होती आणि संध्याकाळच्या शोमध्ये सर्वाधिक गर्दी ९७.१५ % होती. तर सकाळच्या शोमध्ये ६९.४१ % आणि दुपारच्या शोमध्ये ९६.४ % नोंद झाली.
सोमवारपर्यंत जगभरात २३०.०० कोटी
अनिल शर्मा दिग्दर्शित चित्रपटाने, भारतात केवळ चार दिवसात १६३.५८ कोटींचे निव्वळ कलेक्शन झाले, तर एकूण संकलन २०५.०० कोटी झाले आहे. सोमवारपर्यंत जगभरात २३०.०० कोटी रुपये जमा झाले असून परदेशात २5 कोटी रुपये जमा झाले आहेत.
या चित्रपटाने ७५ कोटींची कमाई केली असती
बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, स्वातंत्र्य दिनानिमित्त तिकीट खिडकीवर पहिल्यांदाच ऐतिहासिक गर्दी पाहायला मिळाली आणि दुपारच्या शोसाठी तिकीटही उपलब्ध नव्हती. यावेळी चित्रपटगृहांमध्ये हा एकच रिलीज झालेला चित्रपट असता तर चित्रपटाची कमाई ‘गदर २’ आणि ‘OMG २’ च्या एकत्रित कमाईपेक्षा जास्त झाली असती. अशा परिस्थितीत या चित्रपटाने ७५ कोटींचीही कमाई केली असण्याची शक्यता असती. स्वातंत्र्यदिनाच्या देशभक्तीच्या भावनेमुळे चित्रपटाची प्रचंड क्रेझ होती आणि त्यामुळेच इतर दिवसांपेक्षा मंगळवारी चित्रपटगृहांबाहेर गर्दी जास्त दिसून आली.
सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरू शकतो
या चित्रपटाचे यश हेच दर्शवू लागले आहे की हा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर हिंदी चित्रपट ठरेल आणि ‘गदर २’ देखील सर्वाधिक कमाई करणारा ठरेल.