ASRB Recruitment 2023 Registration In Process: तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर तुम्ही या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. अॅग्रीकल्चर सायंटिस्ट्स रिक्रूटमेंट बोर्डने काही पदांवर भरतीची घोषणा केली आहे. सदर पदांसाठी फक्त ऑनलाइनमाध्यमातून अर्ज करता येणार आहे. या जागांच्या भरतीसाठी ASRB च्या अधिकृत वेबसाइटवर तुम्हाला अर्ज भरणे अनिवार्य असणार आहे.
अॅग्रीकल्चर सायंटिस्ट्स रिक्रूटमेंट बोर्ड केल्याप्रमाणे अधिकृत वेबसाइटवरील ऑनलाइन अर्जा व्यतिरिक्त इतर माध्यमातून केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या पदांसाठी १८ ऑगस्टपासून भरतीची प्रक्रिया सुरु होणार असून, ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. पदांचा तपशील, अर्ज करण्याची पद्धत आणि या भरतीसंदर्भातील इतर माहिती जाणून घ्या.

(वाचा : Career In Architecture Industry: आर्किटेक्ट बनून घडवायचंय भक्कम करिअर..? मग ही माहिती तुमच्यासाठी)
पदभरतीचा तपशील :
प्रिन्सिपल सायन्टिस्ट (Principal Scientist) : ८० जागा
सिनिअर सायन्टिस्ट (Senior Scientist) : २८८ जागा
एकूण रिक्त पदे : ३६८ जागा
पात्रता :
थोडक्यात, संबंधित विषयात पीएचडी केलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
प्रिन्सिपल सायन्टिस्ट पदासाठी ५२ वर्षांपर्यंत आणि सीनिअर सायन्टिस्ट पदासाठी ४७ वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करू शकतात.
ASRB Recruitment मध्ये पदनिहाय पात्रता भिन्न असल्यामुळे ASRB ने पात्रता आणि निकषांविषयी अधिक माहितीसाठी मूळ जाहीरात पाहा.
अर्ज शुल्काविषयी :
- सदर भरतीसाठी फी जमा करण्याची शेवटची तारीख देखील ८ सप्टेंबर आहे.
- अर्ज करण्यासाठी, यूआर आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना १५०० रुपये शुल्क भरावे लागेल.
- SC, ST, PH आणि महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
असा करा शकता अर्ज :
- ASRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ASRB Recruitment 2023 लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर समोर आलेल्या स्वतःची नोंदणी करा.
- आता अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे निश्चित नमुन्यात अपलोड करा.
- शेवटी अर्जाची फी भरा आणि त्याची प्रिंट काढा.
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
(वाचा : नागपूर विद्यापीठात भरती सुरु; प्राध्यापक पदाच्या विविध जागांसाठी विना परीक्षा थेट मुलाखतीद्वारे पार पडणार निवड प्रक्रिया)