सावधान! AI लाही कान असतात! फक्त टायपिंग ऐकून पासवर्ड ओळखणारं एआय आलं

मॅकबुक प्रो वर ट्रेनिंग

संशोधनात सामील असलेल्या कम्प्युटर सायंटिस्टच्या एका तुकडीनं २०२१ मधील मॅकबुक प्रोवर एक एआय मॉडेल ट्रेन केला जो टायपिंगचा ध्वनी ओळखतो. एका झूम व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान ह्या एआयचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. त्यात एआयनं लॅपटॉपच्या माइकमधून ऐकून अचूकरित्या किस्ट्रोक ओळखले.

९३ टक्के अचूकता

ह्या एआय प्रग्रामनं ९३ टक्के अचूकता दाखवली, जी अशाप्रकारच्या हल्ल्यासाठी सर्वाधिक आहे. अशाप्रकारच्या हल्ल्याची अनेकांना माहिती नाही ज्यात हॅकर टायपिंगवर लक्ष ठेवून अकॉऊंट्सचा अ‍ॅक्सेस मिळवू शकतो, अशी चिंता देखील संशोधकांनी व्यक्त केली. अशाप्रकारच्या सायबर हल्ल्याला ‘अकुस्टिक साइड-चॅनल अटॅक’ म्हणतात.

वाचा: जगभरात जाणाऱ्या iPhone 15 वर असणार भारताची छाप; ‘या’ शहरात होणार निर्मिती

अकुस्टिक साइड-चॅनल अटॅक म्हणजे काय?

अकुस्टिक साइड-चॅनल अटॅक हा सायबर अटॅकचा एक प्रकार आहे, ज्यात कम्प्युटिंग डिवाइसमधून येणारे विविध आवाज किंवा व्हायब्रेशनचा वापर संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी केला जातो. साइड-चॅनल अटॅक हा अटॅकचा एक प्रकार आहे ज्यात क्रिप्टोग्राफिकच्या एकजीक्यूशन दरम्यान लीक झालेल्या माहितीचा गैरफायदा घेतला जातो, जसं की टायमिंग, पावर कंजम्प्शन इलेकट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आणि ह्याबाबतीत अकुस्टिक सिग्नल.

माउस क्लिक देखील होतात डिकोड

अकुस्टिक साइड-चॅनल अटॅकमध्ये अटॅकर खास टूल किंवा टेक्निकचा वापर करून डिवाइसचा ध्वनी कॅप्चर करतो. ज्यात टायपिंग, माउस क्लिक्स किंवा डेटा प्रोसेस करताना डिवाइसच्या कंपोनंटमधून येणाऱ्या आवाजाचा समावेश होतो. ह्या आवाजांतून डिवाइसची मूल्यवान माहिती मिळू शकते.

वाचा: सर्वांच्या आवाक्यात येऊ शकतो 200MP चा कॅमेरा; Redmi Note 13 सीरीजच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

ध्वनी तरंगांचे विश्लेषण

ध्वनी तरंगांचे विश्लेषण करून अटॅकर पासवर्ड, पिन्स किंवा इतर गुप्त माहिती शोधून काढू शकतो, जी एखाद्या यूजरकडून डिवाइसवर एंटर केली जाते. ही धोकादायक पद्धत आहे कारण बऱ्याचदा युजर्सना माहित नसतं की त्यांच्या टायपिंगमधून निघणारा ध्वनी त्यांच्या सुरक्षेसाठी घातक आहे.

Source link

aihackingpasswordएआयएआय हॅकिंगहॅकिंग
Comments (0)
Add Comment