टोमॅटोचे भाव अचानक कोसळले; वैतागलेल्या तरुण शेतकऱ्याने रागाच्या भरात…

हायलाइट्स:

  • शेतकरी पुन्हा संकटात
  • टॉमेटोचे भाव अचानक कोसळल्याने उत्पादन खर्च काढणंही झालं अवघड
  • तरुण शेतकऱ्याने व्यक्त केला रोष

सोलापूर : विविध अडचणींमुळे शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली आहे. मोठ्या कष्टाने घेतलेली पिके कधी पाण्याअभावी तर कधी अतिपावसामुळे डोळ्यादेखत उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. मागील दोन वर्षांपासून तर लॉकडाऊनमुळे बळीराजा पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. असं असतानाच आता हाडाची काडे करून दिवस-रात्र शेतामध्ये राब-राब राबून घेतलेली पिके भाव मिळत नसल्यामुळे मुळासकट उखडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून टोमॅटोचा दर शून्यावर येऊन ठेपला आहे. मागील आठवड्यात एक कॅरेट टोमॅटोचे साडेतीनशे ते चारशे रुपये येत होते. मात्र याच एक कॅरेट टोमॅटोला आता फक्त ५ ते ६ रुपये दर मिळत आहे. त्यामुळे गावांमधून अनेक किलोमीटर दूर असलेल्या बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी नेलेल्या टोमॅटोच्या विक्रीतून हातात एकही रुपया न पडता उलट ज्या वाहनातून टोमॅटोचे कॅरेट बाजार समितीत नेण्यात आले त्याचे भाडेसुद्धा शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातूनच देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

Uddhav Thackeray: ‘गडकरी साहेब तुम्ही बोलता गोड, पण…’; ‘त्या’ पत्रावर CM ठाकरे यांची टोलेबाजी

टोमॅटोचे भाव गडगडल्याने पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील अनिकेत खरात या तरुण शेतकऱ्याने आपला २ एकर शेतातील टोमॅटोचा प्लॉटच उखडून टाकला आहे. हा प्लॉट उखडताना हा शेतकरी व्यवस्थेविरोधात रोष व्यक्त करत आहे. मर-मर मरून उत्पादित केलेल्या शेतीमालाला जर कवडीमोल दराने किंवा शून्य रुपये दर मिळत असेल तर शेती करावी की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे .

दरम्यान, टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी या तरुण शेतकऱ्याने दोन एकरात एक ते दीड लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र बाजारभाव पडल्यामुळे या तरुण शेतकऱ्याने संतापाच्या भरात अखेर आपला दोन एकराचा टोमॅटोचा प्लॉट उद्ध्वस्त करून टाकत राग व्यक्त केला.

Source link

farmer cropsolapur news in marathiशेतकरीसोलापूरसोलापूर न्यूज
Comments (0)
Add Comment