मीडिया रिपोर्टनुसार Redmi Note 13 सीरीजच्या एका मॉडेलमध्ये अलीकडेच आलेल्या Redmi K60 Ultra सारखा MediaTek Dimensity 9200+ चिपसेट दिला जाऊ शकतो. परंतु हा मॉडेल कोणता असेल हे समजलं नाही. विशेष म्हणजे ह्या मॉडेलमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यातील मुख्य कॅमेरा २००-मेगापिक्सलचा सॅमसंग एचपी३ प्रायमरी सेन्सर असू शकतो.
वाचा: WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता AI जनरेटेड स्टीकर्स तयार होणार
200MP कॅमेरा
२००-मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह सेटअपमध्ये ८-मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स ३५५ अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि २-मेगापिक्सल ओमनीव्हिजन ओव्ही२बी१० डेप्थ किंवा मॅक्रो लेन्स मिळेल. तसेच, Redmi Note 13 सीरीजच्या ह्या मॉडेलमध्ये १६-मेगापिक्सल ओमनीव्हिजन ओव्ही१६ए१क्यू फ्रंट कॅमेरा सेन्सर असण्याची माहिती देण्यात आली होन.
Redmi Note 13 Pro+ मध्ये आधी ४एक्स इन-सेन्सर झूमसह २००-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर असल्याची माहिती आधीही मिळाली होती. हायएन्ड मॉडेलमध्ये १.५के रिजॉल्यूशन आणि १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह कर्व्ड-एज डिस्प्ले असल्याची माहिती देखील आली आहे.
वाचा: जगभरात जाणाऱ्या iPhone 15 वर असणार भारताची छाप; ‘या’ शहरात होणार निर्मिती
120W फास्ट चार्जिंग
तसेच आगामी Redmi Note 13 सीरीजच्या Pro+ व्हेरिएंटमध्ये १२०वॉट वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,०००एमएएच ची बॅटरी मिळेल. विशेष म्हणजे अलीकडेच संभाव्य रेडमी नोट १३ ५जी स्मार्टफोन इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी (IMEI) वेबसाइटवर दिसला होता. त्यामुळे लवकरच ही सीरिज बाजारात येण्याची शक्यता वाढली आहे.