प्राध्यापक पदाच्या ९२ जागांसाठी नागपूर विद्यापीठात भरती; थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार निवड

RTM Nagpur University Recruitment 2023: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थंमधील रिक्त पदांच्या भरतीसाठीजाहीरात प्रसीद्ध करण्यात आली आहे. सादर भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदाच्या ९२ जागांवर भरती करण्यात येणार आहे.

नागपूर वियापीठातील या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर २० सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑफलाइन अर्जज करते अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परीक्षेविना थेट मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पदांचा तपशील :

1. प्राध्यापक (Professor) : १८ जागा
2. Associate Professor : २५ जागा
3. Assistant Professor : ४९ जागा

एकूण रिक्त जागा : ९२

महत्त्वाच्या लिंक :

मूळ जाहीरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
ऑफलाइन अर्जाचा नमुना पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्त्वाचे :

  • अर्ज करण्याची पध्दत : ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० सप्टेंबर २०२३
  • नोकरी करण्याचे ठिकाण : नागपूर
  • निवड प्रक्रिया : मुलाखत

अर्ज पाठविण्याचा पत्ता :
रजिस्टार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत, महात्मा जोतिबा फुले शैक्षणिक परिसर, कॅम्पस स्क्वेअर ते अंबाझरी टी-पॉइंट मार्ग, नागपूर – ४४००३३ (एमएस), भारत

(वाचा : Agriculture Department Recruitment 2023: कृषी विभागात २५५ जागांसाठी भरती सुरु; कृषी पदविका, पदवीधरांसाठी सुवर्णसंधी)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

प्राध्यापक पदासाठी :
पीएच.डी. पदवी / विद्यापीठ / महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक / Associate Professor /Assistant Professor म्हणून किमान दहा वर्षांचा अध्यापन अनुभव. पीएच.डी. संबंधित/संलग्न/उपयोजित विषयातील पदवी, कोणत्याही शैक्षणिक संस्थांकडून (वरील ‘A’ मध्ये समाविष्ट नाही)/उद्योग ज्याने संबंधित/संलग्न/संबंधित विषयातील ज्ञानामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, त्याला/तिने प्रदान केलेल्या कागदोपत्री पुराव्यांद्वारे समर्थित दहा वर्षांचा अनुभव.

Associate Professor (सहयोगी प्राध्यापक) पदासाठी :
पीएच.डी.सह चांगला शैक्षणिक रेकॉर्ड संबंधित/संलग्न/संबंधित विषयातील पदवी विद्यापीठ, महाविद्यालय किंवा मान्यताप्राप्त संशोधन संस्था/उद्योगात सहाय्यक प्राध्यापकाच्या समतुल्य शैक्षणिक/संशोधन पदावरील तांत्रिक/किंवा संशोधनाचा किमान आठ वर्षांचा अनुभव.

Assistant Professor (सहाय्यक प्राध्यापक) पदासाठी :
पदव्युत्तर पदवी / बी. फार्म. आणि एम. फार्म / फार्म. डी. संबंधित स्पेशलायझेशनमध्ये प्रथम श्रेणी किंवा दोनपैकी कोणत्याही एका पदवीमध्ये समकक्ष.

वेतनविषयक :

० प्राध्यापक [Pay Band (AL-14)] : १ लाख ४४ हजार २०० ते २ लाख १८ हजार २०० रुपयांपर्यंत
० Associate Professor [Pay Band (AL-13A)] : १ लाख ३१ हजार ४०० ते २ लक्ष १७ हजार १०० रुपयांपर्यंत
० Assistant Professor [Pay Band (AL-10)] : ५७ हजार ७०० ते १ लाख ४०० रुपयांपर्यंत

असा करा अर्ज :

1. सदर सर्व पदांसाठी भरतीप्रक्रिया संपूर्णतः ऑफलाइन होणार असून, त्यामुळे भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. ई-मेल आणि फॅक्सद्वारे प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
3. कोणत्याही बाबतीत अपूर्ण असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
4. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर २०२३ आहे.
5. विहित अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
शिवाय, सादर उमेदवाराशी या संदर्भात कोणताही संवाद साधला जाणार नाही.

निवड प्रक्रिया :

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील उपरोक्त सर्व जागांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी अर्जदारांना TA/DA दिला जाणार नाही.
  • उमेदवाराच्या कामाचा अनुभव, कुशलता आणि मुलाखतीदरम्यानच्या कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड निश्चित केली जाणार आहे.

(वाचा : BMM Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; २२६ जागांच्या भरतीची घोषणा)

Source link

Assistant Professorassistant professor recruitmentAssociate ProfessorJob in Nagpurjob vacancyNagpurNagpur UniversityprofessorRTM Nagpur University Recruitment 2023RTMNU Recruitment 2023
Comments (0)
Add Comment