‘हिंदूस्थान एअरोनॉटिक्स’ ने भारतातील सात राज्यांमधील विविध प्रोडक्शन विभाग, नूतनीकरण आणि देखभाल विभाग, रिसर्च आणि डिझाईन सेंटर्स मध्ये काम करण्यासाठी विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. यामध्ये बंगळूरु, नाशिक, कोरापत (ओडिशा), लखनौ, कानपूर आणि कोरवा (उत्तर प्रदेश) आदी ठिकाणांचा समावेश आहे. तर विविध विभागातील डिझाईन ट्रेनी आणि मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी आणि एकूण १८५ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
भारतीय साठीची पदे आणि जागा…
एकूण १८५ रिक्त जागा असून त्यापैकी ९५ जागा डिझाईन ट्रेनी आणि ९० जागा मॅनेजमेंट ट्रेनी अशा स्वरूपात विभागण्यात आल्या आहेत. त्या जागांचा तपशील पुढील प्रमाणे..
डिझाईन ट्रेनी : एकूण ९५ जागा, त्या पुढील प्रमाणे..
- एअरोनॉटिकल – ९ जागा
- इलेक्ट्रिकल – १२
- इलेक्ट्रॉनिक्स – ४४
- मेकॅनिकल – ३०
(यातील ४ जागा दिव्यांग वर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत)
(वाचा : Panvel Mahanagar Palika Recruitment 2023: पनवेल महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! लगेचच अर्ज करा..)
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) : एकूण ९० जागा, त्या पुढील प्रमाणे
- कॉम्प्युटर सायन्स – २३
- इलेक्ट्रिकल – १६
- इलेक्ट्रॉनिक्स – १३
- मेकॅनिकल – ३०
- प्रोडक्शन – ५
- मेटॅलर्जी – ३
पात्रता – सर्व पदांसाठी संबंधित विद्याशाखेतील इंजीनिअरिंग/ टेक्नॉलॉजीमधील पदवी सरासरी किमान ७० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तर अजा/ अज/ दिव्यांग या राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६० टक्के गुण गरजेचे आहेत. पात्रता परीक्षेच्या अंतिम वर्षांचे उमेदवार देखील अर्ज करू शकतात. त्यांना ऑक्टोबर, २०२३ मध्ये होणाऱ्या मुलाखतीवेळी पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्याचा पुरावा सादर करावा लागेल.
वयोमर्यादा – २२ ऑगस्ट २०२३ पर्यंत जास्तीत जास्त २८ वर्षे. तर इमाव – ३१ वर्षे, अजा/अज – ३३ वर्षे आणि दिव्यांग – ३८/ ४१/ ४३ वर्षे ही वयोमर्यादा आहे.
अर्ज कसा करावा..- या भरती प्रक्रियेत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यासाठी www.hal-india.co.in हे अधिकृत संकेतस्थळ देण्यात आले आहे. अर्जाचे शुल्क ५०० रुपये असून अजा/ अज/ दिव्यांग/ खाते अंतर्गत उमेदवारांना फी माफ आहे. अर्ज करताना काही अडचण आल्यास तुम्ही halrecruitmentsqst@gmail.com या मेल आयडीवरून त्यांच्याशी संपर्क साधू शकता. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख २२ ऑगस्ट २०२३ (सायंकाळी ५ .०० वाजे पर्यंत) आहे.
निवड पद्धती- अर्जदार उमेदवारांची आधी ऑनलाइन सिलेक्शन टेस्ट होईल. त्यातील उत्तीर्ण उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाईल. यामध्ये मूल्यांकन करताना ऑनलाइन टेस्टला ८५ टक्के तर मुलाखतीला १५ टक्के महत्व असेल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि मग निवडलेल्या उमेदवारांना ५२ आठवडय़ांचे ट्रेनिंग दिले जाईल.वेतन-ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना दरमहा स्टायपेंड दिले जाईल. ट्रेनिंग हे हिंदुस्थान एरोनॉटिक्स, बंगळूर येथे होईल. ट्रेनिंग दरम्यान बॅचलर्स अकोमोडेशन दिले जाईल. ट्रेनिंगनंतर पदावर रुजू झालेल्या उमेदवारांना वेतन श्रेणी ४० हजार ते १ लाख ४० हजार कायम केले जाईल. मूळ वेतनाशिवाय इतर भत्ते देखील दिले जाणार आहे.
(वाचा: MPSC Exam: स्पर्धा परीक्षेचा विचार करताय? मग जाणून घ्या ‘एमपीएससी’ म्हणजे नेमके काय?)