(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)
जळगाव: उत्तर प्रदेशातील शायर मुनव्वर राणा यांची अफगणिस्तान देशावरील सद्यस्थीती मुद्यावरील मुलाखतीत महर्षी वाल्मिकी यांची तुलना तालिबानी यांच्याशी केली गेल्याने या विरोधात आदिवासी वाल्मीकलव्य सेनेच्यावतीने शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात तर आलाच सोबतच राणा यांच्या पूतळ्याचे दहन ही करण्यात आले.
अफगाणिस्तान देशावर तालिबान्यांनी ताबा घेतला आहे. यावरून उत्तर प्रदेशातील शायर मुनव्वर राणा यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत देतांना वादग्रस्त विधान करीत महर्षी वाल्मिक ऋषींची तुलना तालीबान्यांशी केली.
या वक्तव्यावर सर्व माध्यमांतून टिका देखील झाली. या वादग्रस्त विधानाबाबत आज जळगाव येथील भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी जळगाव शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
मुनव्वर राणा यांनी अफगणिस्तान तालिबान्यांनी ताब्यात घेतल्याने त्याचे समर्थन केले. तसेच महर्षी वाल्मिकी ऋषी यांना ‘दरोडेखोर,असे संबोधन करीत तालिबानींशी तुलना केली. या विरोधात आदीवासी वाल्मीकलव्य सेना यांच्यावतीने शहरातील टॉवर चौकात पुतळा दहन करण्यात आला.