Honor च्या नव्या फोनची एंट्री; कमी किंमतीत ५,२००एमएएचची बॅटरी आणि ५०MP camera

HONOR नं आपल्या भारतातील पुनरागमनाची घोषणा केली आहे. तेव्हापासून ग्राहक कंपनीच्या नव्या स्मार्टफोनच्या लाँचची आतुरतेने वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरच्या सुरुवातीला ब्रँडचा पहिला मोबाइल फोन भारतात सादर होऊ शकतो. परंतु जागतिक बाजारात कंपनीनं एक नवीन स्मार्टफोन HONOR X5 Plus टेक मंचावर सादर केला आहे, हा स्वस्त मोबाइल लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे.

HONOR X5 Plus चे स्पेसिफिकेशन्स

हा मोबाइल २०.१५:९ अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो ७२० × १६१२ पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या ६.५६ इंचाच्या मोठ्या स्क्रीनला सपोर्ट करतो. हा डिस्प्ले टीएफटी एलसीडी पॅनलवर बनला आहे जो ९०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

वाचा: Honor ब्रँडचं भारतात पुनरागमन! ‘हा’ स्मार्टफोन लवकरच होणार लाँच

ऑनर एक्स५ प्लस अँड्रॉइड १३ आधारित मॅजिक ओएस ७.१ वर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी २.२गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड असलेला मीडियाटेक हीलियो जी३६ ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन आईएमजी जीई८३२० जीपीयूला सपोर्ट करतो.

हा फोन ४जीबी रॅमसह सादर करण्यात आला आहे. जोडीला ६४जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येतो. पावर बॅकअपसाठी HONOR X5 Plus स्मार्टफोन ५,२००एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. त्याचबरोबर ह्या मोबाइलमध्ये १०वॉट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा फोन असलेला ५ मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

वाचा: लॅपटॉपच्या दुप्पट रॅम आणि सर्वात शक्तिशाली प्रोसेसर; OnePlus Ace 2 Pro ची दणक्यात एंट्री

HONOR X5 Plus ची किंमत

कंपनीनं सध्या ह्या मोबाइल फोनची किंमत सांगितली नाही परंतु ऑनर एक्स५ प्लसचे स्पेसिफिकेशन्स पाहता ह्याची किंमत १०,००० रुपयांच्या आसपास ठेवली जाऊ शकते. हा फोन Midnight Black आणि Cyan Lake कलरमध्ये सादर झाला आहे. लवकरच हा फोन भारतीयांच्या भेटीला येईल अशी अपेक्षा आहे.

https://www.youtube.com/watch?v=BRw7__eW7oY

Source link

honorhonor phone launchhonor x5 plusऑनरऑनर एक्स५ प्लसऑनर फोन लाँच
Comments (0)
Add Comment