जातीच्या मुद्द्यावर राज ठाकरे पुन्हा बोलले; म्हणाले, पवार साहेबांनी…

हायलाइट्स:

  • राज ठाकरे यांचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल
  • राष्ट्रवादीमुळंच राज्यात जातीयवाद वाढल्याचा आरोप
  • शरद पवार यांच्या सल्ल्यावरही दिली प्रतिक्रिया

पुणे: जातीयवादाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना आपल्या आजोबांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला होता. त्यावर राज यांनी आज प्रतिक्रिया दिली. सोयीनं प्रबोधनकारांचं नाव घेऊ नका,’ असा टोला राज यांनी पवारांना हाणला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीय द्वेष वाढला, असं वक्तव्य राज यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. जेम्स लेन हा कुठून आला? असं सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसनं विनाकारण त्याचा बाऊ केल्याचं राज म्हणाले होते. जेम्स लेनचा उल्लेख आल्यानं संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघानं राज यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर, शरद पवार यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला होता. आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पवारांच्या सल्ल्यावर प्रतिक्रिया दिली.

वाचा:तहसीलदाराच्या ऑडिओ क्लिपमुळे खळबळ; राष्ट्रवादीच्या आमदाराने सोडले मौन

‘मी प्रबोधनकार आणि यशवंतराव चव्हाण दोघांचीही पुस्तकं वाचली आहेत. पण मी बोलतो त्याचा आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे पवार साहेबांनी मला समजावून सांगावं. त्यांनी सोयीनं प्रबोधनकारांचं नाव घेऊ नये,’ असं राज यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरच जातीयवाद वाढल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. ‘देशात हजारो वर्षांपासून जाती आहेत; पण जात हा मुद्दा निवडणूक वेळी समोर येतो. १९९९ पर्यंत केवळ जाती आणि अभिमान होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जाती द्वेष वाढला. आधी प्रत्येकाला जातीबद्दल अभिमान वाटायचा, राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर द्वेष सुरू झाला. हे सर्वांना माहितीय. मी केवळ बोललो,’ असं ते म्हणाले.

मी प्रबोधनकार आणि यशवंतराव चव्हाण दोघांचीही पुस्तकं वाचली आहेत. पण मी बोलतो त्याचा आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे पवार साहेबांनी मला समजावून सांगावं. त्यांनी सोयीनं प्रबोधनकारांचं नाव घेऊ नये

राज ठाकरे

वाचा: असं कसं झालं? भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत काँग्रेसचे आमदार

‘मागच्या २० वर्षांमध्ये शाळा, कॉलेज आणि मित्रांमध्ये जाती आल्या. उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्र जातीचा करायचा का? जातीपातीतून महाराष्ट्र बाहेर आला पाहिजे. राजकीय पक्षांतील जातीचे विभाग केवळ निवडणुकीसाठी आहेत. या विभागांमुळे लोकांच्या आयुष्यात सुखशांती येत नाही,’ असंही ते म्हणाले. ‘मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा. निवडणुकीच्या फायद्यायाठी आरक्षणावरून तरुणांची माथी भडकवू नका,’ असंही त्यांनी सुनावलं.

वाचा: कोल्हापूर हादरले! स्वत:ला मूल होत नसल्यानं मित्राच्या मुलाचा नरबळी?

Source link

Caste Politics in MaharashtraMaharashtra politicsMNS chief Raj ThackerayRaj Thackeray Attacks NCP for Caste Conflictsraj thackeray in puneraj thackeray news todayRaj Thackeray Reply To Sharad Pawarराज ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Comments (0)
Add Comment