वक्फ मंडळातील ही भरती सरळ सेवेने भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. हे अर्ज अल्पसंख्याक विकास विभागाच्या आणि वक्फ मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या भरतीमधील प्रत्येक संवर्गासाठी १ हजार रुपये अर्जाचे शुल्क आहे. एका पेक्षा अधिक संवर्ग निवडल्यास त्याचे वेगळे शुल्क भरणे गरजेचे आहे. तसेच ४ सप्टेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे.
या पदांसाठी पात्रतेच्या अटीमधील एक महत्वाची अट म्हणजे पात्र उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातीलच असायला हवा. तसेच अर्जदार उमेदवार किमान माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. ज्याचे सर्व तपशील ‘या’ लिंकमध्ये दिले आहेत. तसेच हे https://mahawakf.com वक्फ मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ आहे.
(वाचा: Government Hospital Jobs: सरकारी रुग्णालयात १४ हजारांहून अधिक पदांसाठी महाभरती! ही पदे रिक्त…)
वक्फ मंडळातील रिक्त पदे आणि जागा
जिल्हा वक्फ अधिकारी/अधीक्षक – २५ जागा
कनिष्ठ लिपिक – ३१ जागा
लघुटंकलेखक – १ जागा
कनिष्ठ अभियंता – १ जागा
विधी सहाय्यक – २ जागा
वेतन
– या पदभरती मध्ये विविध पदांसाठी वेगवेगळे वेतन आहे. साधारण २० हजारांपासून ३५ हजारांपर्यंतचे हे वेतन असून इतर अनुदय भत्ते वेगळे दिले जाणार आहेत.
वय
– या पदांसाठी उमेदवाराचे वय १ जुलै २०२३ पर्यंत कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे असावे. तर जी व्यक्ती आधीपासूनच महाराष्ट्र वक्फ मंडळाच्या सेवेत कार्यरत असेल तर त्या कर्मचाऱ्यांच्याचे वय जास्तीत जास्त ४८ वर्षे असावे.
परीक्षा कशी असेल?
– सर्व पदांसाठी मराठी तसेच इंग्रजी या दोन माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रात घेण्यात येईल. ऑनलाईन परीक्षेची तारीख मंडळाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. या परीक्षेमध्ये उमेदवारांना कमीत कमी ४५% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
(वाचा: Vishwas Nangare patil: स्पर्धा परीक्षा देताय? मग विश्वास नांगरे पाटलांचा ‘हा’ कानमंत्र डोक्यात फिट्ट करा..)