राज्यातील दंत महाविद्यालयात १३ हजार ३९१ पदे रिक्त आहेत तर आयुर्वेद महाविद्यालयात ८७६ पदे रिक्त आहेत. यातल्या गट-अ, गट ब मधील रिक्त पदे सरळसेवेने किंवा पदोन्नतीने भरण्याबाबतची प्रक्रिया सुरु असून येत्या काळात वैद्यकीय शिक्षण विभागातील ही सर्व पदे भरले जाणार आहेत, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
दंत महाविद्यालयातील पदभरती मध्ये अधिष्ठाता -८, प्राध्यापक -२४५, सहयोगी प्राध्यापक – ४६ प्राध्यापक – १००८, गट क – ७७५६, गट ड – ३९७४ अशी एकूण १३ हजार ३९१ पदे रिक्त आहेत. तर सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये ८७६ रिक्त पदे असणार आहेत. ज्यामध्ये अधिष्ठाता -२, प्राध्यापक -२६, सहयोगी प्राध्यापक – ४४ प्राध्यापक – ८६, गट क – ५१० आणि गट ड मधील २१० पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ‘गट क’ संवर्गाची ५१८० पदे भरण्याकरिता टीसीएस आयओएन कंपनीकडून स्पर्धा परीक्षा घेण्यात आली गट ड संवर्गातील पदे जिल्हास्तरीय समिती मार्फत भरण्यात येणार आहेत. तर सरकारी आयुर्वेद महाविद्यालयतील सरळसेवेतून भरण्यात येणाऱ्या अध्यापक संवर्गातील ११४ रिक्त पदांचे आरक्षण सामान्य प्रशासन विभागाकडून निश्चित करण्यात आले आहे. या संबंधीचे मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविण्यात आले असून ही पदेभरेपर्यंत कंत्राटी तत्वावर पद भरण्यात येणार आहेत.
(वाचा: Vishwas Nangare patil: स्पर्धा परीक्षा देताय? मग विश्वास नांगरे पाटलांचा ‘हा’ कानमंत्र डोक्यात फिट्ट करा..)
दंत महाविद्यालयातील रिक्त पदे:
- अधिष्ठाता ८
- प्राध्यापक २४५
- सहयोगी प्राध्यापक ४६
- सहाय्यक प्राध्यापक १००८
- गट क ७७५६
- गट ड ३९७४
- एकूण १३३९१
सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालयातील रिक्त पदे:
- अधिष्ठाता २
- प्राध्यापक २६
- सहयोगी प्राध्यापक ४४
- सहाय्यक प्राध्यापक ८६
- गट क ५१०
- गट ड २१०
- एकूण ८७६
(वाचा: MPSC Exam: स्पर्धा परीक्षेचा विचार करताय? मग जाणून घ्या ‘एमपीएससी’ म्हणजे नेमके काय? )