ठाणे कृषी विभाग भरती मंडळ, ठाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार ही भरती एकूण २५५ जागांसाठी असणार आहे. तर या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदभरतीचा तपशील :
पदाचे नाव : कृषी सेवक.
अनुसूचित क्षेत्राबाहेरील पदसंख्या : २४७
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) स्थानिक अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता पदसंख्या : ४७
एकूण रिक्त पदे :२५५
नोकरीचे ठिकाण : ठाणे
पगार : महिना १६ हजार रुपये.
(वाचा : BMM Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेत १० वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; २२६ जागांच्या भरतीची घोषणा)
शैक्षणिक पात्रता आणि अटी :
सदर पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार हा भारतीय नागरिक असावा.
शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील कृषी पदविका, कृषी पदवी किंवा समतुल्य.
वयोमर्यादा :
- खुला प्रवर्ग : १९ ते ४० वर्षे.
- मागासवर्गीय : १९ ते ४५ वर्षे.
- दिव्यांग उमेदवार : ४५ वर्षांपर्यंत शिथिलता
- प्राविण्य प्राप्त खेळाडू उमेदवार : ४३ वर्षापर्यंत शिथिलता
- माजी सैनिक उमेदवार : सैनिक सेवेचा कालावधी अधिक ३ वर्षे
- विकलांग माजी सैनिक : ४५ वर्षांपर्यंत शिथिलता
- अनाथ उमेदवार : ४३ वर्षांपर्यंत शिथिलता
- अंशकालीन उमेदवार : ५५ वर्षांपर्यंत शिथिलता
- भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त उमेदवार : ४५ वर्षांपर्यंत शिथिलता
(वाचा : BARC Recruitment 2023: भाभा अणु संशोधन केंद्रात १०५ पदांसाठी भरती सुरु; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी)
परीक्षा शुल्क :
अमागास : ७२० रुपये
मागासवर्गीय/ आ.दु.घ/अनाथ/ दिव्यांग/ माजी सैनिक : ६५० रुपये
महत्त्वाचे :
उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील डे कर अतिरिक्त असतील.
परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-Refundable) असेल.
निवड प्रक्रिया आणि पद्धत :
- जाहीरातीमध्ये नमूद पात्रता विषयक अटींची किमान पूर्तता करणे आवशषयक आहे, याव्यतिरिक्त उमेदवार कोणत्याही शिफारशीस पात्र असणार नाही.
- सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमामधून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाइन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल.
- Computer Based Online Examination च्या माध्यमातून प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवाराची निवड केली जाईल.
- या गुणवत्ता यादीत समाविष्ट होण्यासाठी उपरोक्त परीक्षेत उमेदवाराने किमान ४५ टक्के गुण मिळवणे अनिवार्य असणार आहे.
- सदर परीक्षेत २०० गुणांसाठी १४० प्रश्न विचारले जाणार आहे
(परीक्षेच्या अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा)
सदर भरती संदर्भात राखीव जागांचा तपशील, आरक्षण, निवडीचे निकष आणि कार्यपद्धती, अर्ज करण्याच्या मार्गदर्शक सूचना, परिक्षा केंद्रांविषयी नियमावली, ओळख पडताळणी आणि अन्य महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Indian Navy Recruitment 2023: भारतीय नौदलात एसएससी आयटी एक्झिक्युटिव्हच्या पदांवर भरती, अर्ज कसा करावा)