चिनी कंपनीचा फोन नको, पण स्वस्तात 5G फोन हवा आहे? Samsung M14 5G वर भन्नाट सूट

नवी दिल्ली : Samsung M14 5G Offer Price : चीनच्या कंपनीचे फोन अनेकांना आजकाल नको असतात, त्यात सॅमसंग की कोरियन कंपनी असल्यामुळे आणि एका मोठा ब्रँड असल्यामुळे त्याच्या फोन्सना मागणी आहे. दरम्यान सॅमसंगत्या Samsung Galaxy M14 5G वर सध्या चांगलं डिस्काउंटही मिळत असल्यामुळे हा फोन बजेट ५जी फोन घेऊ इच्छिनाऱ्यांसाठी एक चांगला ऑप्शन आहे… Samsung Galaxy M14 5G ची सुरुवातीची किंमत १४,९९० रुपये आहे परंतु सध्या सॅमसंगच्या साईटवर हा फोन फक्त १२,९९० रुपयांना विकत घेता येईल…

Samsung Galaxy M14 5G वर काय आहे ऑफर?
Samsung Galaxy M14 5G ची किंमत १४,९९० रुपये आहे आणि जर तुम्ही हा फोन कोणत्याही बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरून EMI वर खरेदी केला तर तुम्हाला दोन हजार रुपयांची आणखी सूट मिळेल, त्यानंतर फोनची किंमत ही १२,९९० रुपये असेल.

Samsung Galaxy M14 5G चे स्पेसिफिकेशन
Samsung Galaxy M14 5G मध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस PLS LCD डिस्प्ले पॅनेल आहे, जो 2,408 x 1,080 पिक्सेल रिझोल्यूशनसह येते. तसंच यात 90Hz रिफ्रेश रेट उपलब्ध आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित असून One UI 5 फोनमध्ये Octa Core Exynos 1330 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 128 GB स्टोरेजसह 4 GB आणि 6 GB रॅम पर्याय आहेत. फोनमध्ये सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. कॅमेऱ्याचं म्हणाल तर यात ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. यात f/1.8 अपर्चर आणि PDAF सह ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आहे. मॅक्रो आणि डेप्थ शॉट्ससाठी फोन दोन मेगापिक्सेल सेन्सरने सुसज्ज आहे. समोरच्या बाजूला १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. यात 6,000mAh बॅटरी आहे, 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

वाचा : LCD, OLED की AMOLED? स्मार्टफोनसाठी कोणता डिस्प्ले आहे बेस्ट?

Source link

budget 5g phonesamsung m14 5g featuressamsung m14 5g priceबजेट ५जी फोनसॅमसंग एम१४ स्मार्टफोनसॅमसंग बजेट फोन
Comments (0)
Add Comment