एकापेक्षा एक वरचढ फिचर! १२जीबी रॅमसह येऊ शकतो iQOO Z7 Pro 5G, स्पेसिफिकेशन्स लीक

iQOO नं यावर्षीच्या सुरुवातीला iQOO Z7 सीरीज जागतिक बाजारात सादर केली होती. आता कंपनी ह्या स्मार्टफोनच्या अपग्रेडेड मॉडेलवर काम करत आहे अशी बातमी आली आहे. आगामी iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. कंपनीनं मात्र ह्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. चला जाणून घेऊया आगामी आयकू फोनचे लीक स्पेसिफिकेशन्स.

iQOO Z7 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लीक झालेल्या माहितीनुसार, iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोन मे महिन्यात चीनमध्ये लाँच झालेल्या Vivo S17e चा रीब्रँडेड मॉडेल असू शकतो. दोन्ही मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन्स एकसारखेच आहेत, त्यामुळे ह्या वाक्याला दुजोरा मिळाला आहे. लीक स्पेक्सनुसार Z7 Pro 5G मध्ये ६.७८ इंचाचा कर्व्ड AMOLED डिस्प्ले आहे, ज्यात FHD+ रेजोल्यूशन आणि १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे.

वाचा: सावधान! AI लाही कान असतात! फक्त टायपिंग ऐकून पासवर्ड ओळखणारं एआय आलं

प्रोसेसर पाहता फोनमध्ये कथितरित्या MediaTek Dimensity 7200 चा वापर केला जाऊ शकतो. ह्याआधीच हा फोन AnTuTu बेंचमार्किंग लिस्टिंगमध्ये दिसला होता, १२जीबी रॅम आणि २५६जीबी इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट समोर आला होता. ह्या फोनला पावर देण्यासाठी ४,६००एमएएचची मिळण्याची शक्यता आहे, जी ६६W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करू शकते.

वाचा: सरकारकडून Emergency Alert फीचरची सुरु आहे चाचणी, लवकरच मोबाईलमध्ये येणार खास फीचर

फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर दिला जाईल. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. इतर फीचर्स पाहता ह्यात ब्लूटूथ ५.३, वाय-फाय ६, अँड्रॉइड १३ आणि सेफ्टीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश केला जाऊ शकतो. iQOO हा फोन कधी लाँच करण्याचा विचार करत आहे, हे स्पष्ट झालं नाही नाही. परंतु काही रिपोर्ट्सनुसार हा फोन भारतीय बाजारात ३० हजारांच्या बजेटमध्ये एंट्री करू शकतो.

Source link

iQOOiqoo phoneiqoo z7 pro 5gआयकूआयकू झेड७ प्रो ५जीआयकू फोन
Comments (0)
Add Comment