(जळगाव जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)
एरंडोल:तालुक्यातील शिक्षण विभागाला ऑनलाइन स्वाध्याय उपक्रमात २०२१ या वर्षात दुसरा क्रमांक मिळाला त्याबद्दल मंगळवारी १७ ऑगस्ट २०२१ रोजी जळगाव जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गटशिक्षण अधिकारी विश्वास पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी बि.एस.अकलाडे,व बि.जे.पाटील, डायट प्राचार्य अनिल झोपे आदी उपस्थित होते.